वेलोसिटी विरुद्ध ट्रेलब्रेझर्स संघात महिला टी२० चॅलेंज २०२२ स्पर्धेतील तिसरा सामना खेळला गेला. गुरुवारी (दि. २६ मे) पुण्याच्या एमसीए स्टेडिअमवर खेळला गेलेला हा सामना ट्रेलब्रेझर्स संघाने १६ धावांनी जिंकला. मात्र, या सामन्यात वेलोसिटी संघाची जबरदस्त फलंदाज किरण नवगिरे हिने खास विक्रम केला. यामुळे तिने या विक्रमात अव्वलस्थान पटकावले.
या सामन्यात वेलोसिटी (Velocity) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र, ट्रेलब्रेझर्स (Trailbrazers) संघाच्या त्यांचा हा निर्णय चुकीचा ठरवला. ट्रेलब्रेझर्सने या सामन्यात ५ विकेट्स गमावत १९१ धावांचे आव्हान उभे केले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना वेलोसिटीकडून शेफाली वर्मा आणि यास्तिका भाटिया यांनी डावाची सुरुवात केली. मात्र, चौथ्या षटकाच्या सहाव्या चेंडूवर यास्तिका १९ धावा करून तंबूत परतली.
यानंतर तिसऱ्या क्रमांकावर किरण नवगिरे (Kiran Navgire) फलंदाजीला आली. यावेळी तिने आपल्या बॅटमधून धावांचा पाऊस पाडला. तिने यावेळी फलंदाजी करताना अवघ्या ३४ चेंडूत ६९ धावा चोपल्या. या धावा करताना तिने ५ चौकार आणि ५ षटकारांची बरसात केली. या ५ षटकारांमुळे तिच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. किरण महिला टी२० चॅलेंज स्पर्धेत खेळताना एका डावात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या महिला खेळाडूंच्या यादीत अव्वलस्थानी पोहोचली आहे. विशेष म्हणजे, तिने आपले अर्धशतक फक्त २५ चेंडूत पूर्ण केले. हे या स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात जलद अर्धशतक ठरले.
FIFTY for Navgire off just 25 deliveries👏
That's the fastest half-century in the history of the tournament.
Live – https://t.co/FLFvj1HDlk #VELvTBL #My11CircleWT20C pic.twitter.com/Uvr3LtFecm
— IndianPremierLeague (@IPL) May 26, 2022
तिच्यापाठोपाठ संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानी सब्भीनेनी मेघना आणि चमारी अट्टापट्टू यांचा क्रमांक लागतो. मेघनानेही गुरुवारी झालेल्या वेलोसिटीविरुद्धच्या सामन्यात ४ षटकार मारले होते. दुसरीकडे, २०१९ मध्ये अट्टापट्टूनेही ४ षटकार मारले होते.
महिला टी२० चॅलेंज स्पर्धेत खेळताना एका डावात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाज
५ षटकार- किरण नवगिरे (विरुद्ध ट्रेलब्रेझर्स, २०२२)*
४ षटकार- सब्भीनेनी मेघना (विरुद्ध वेलोसिटी, २०२२)
४ षटकार- चमारी अट्टापट्टू (२०१९)
सामन्याचा आढावा
या सामन्यात वेलोसिटी संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. यावेळी फलंदाजीला आलेल्या ट्रेलब्रेझर्स संघाने ५ विकेट्स गमावत १९० धावा चोपल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना वेलोसिटी संघाला निर्धारित २० षटकात ९ विकेट्स गमावत १७४ धावाच करता आल्या.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
Womens T20 Challenge। मंधानाच्या संघाचा १६ धावांनी दमदार विजय, तरीही वेलोसिटीला मिळालं फायनलचं तिकीट
जेमिमा-मेघनाचा वुमेन्स टी२० चॅलेंजमध्ये नवा कारनामा; तीन वर्षानंतर घडली ती घटना
हसरंगाचा ‘तो’ झेल वैध की अवैध? वाचा काय सांगतो नियम