आयपीएलच्या या हंगामात धावांचा पाऊस पडत आहे. आयपीएल 2024 मध्ये आतापर्यंत एकूण 58 सामने खेळले गेले, ज्यामध्ये तब्बल 8 वेळा 250 हून अधिक धावा झाल्या. याशिवाय या हंगामात आतापर्यंत 1000 हून अधिक षटकार मारले गेले आहेत. या बातमीद्वारे आपण जाणून घेईया की, आयपीएलच्या या हंगामात सर्वाधिक षटकार कोणत्या खेळाडूनं मारले.
आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहली ‘ऑरेंज कॅप’च्या शर्यतीत अव्वल असला तरीही, सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत तो पाचव्या क्रमांकावर आहे. या हंगामात सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत सनरायझर्स हैदराबादचा अभिषेक शर्मा पहिल्या क्रमांकावर आहे. अभिषेकनं आतापर्यंत खेळलेल्या 12 सामन्यांमध्ये 205.64 च्या स्ट्राइक रेटनं 401 धावा ठोल्या आहेत. या दरम्यान त्यानं दोन अर्धशतकं झळकावली आहेत. अभिषेक शर्माने या हंगामात 30 चौकार आणि तब्बल 35 षटकार लगावले आहेत!
तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल, या हंगामात सर्वाधिक षटकार मारण्याच्या बाबतीत टॉप 10 मध्ये 6 भारतीय खेळाडू आहेत. टॉप 10 च्या यादीत सनरायझर्स हैदराबादचे तीन खेळाडू आहेत. दोन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे आणि दोन दिल्ली कॅपिटल्सचे खेळाडू आहेत.
आयपीएल 2024 मध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू
अभिषेक शर्मा – 35 षटकार (12 डाव)
सुनील नारायण – 32 षटकार (11 डाव)
ट्रॅव्हिस हेड – 31 षटकार (11 डाव)
हेनरिक क्लासेन – 31 षटकार (11 डाव)
विराट कोहली – 30 षटकार (12 डाव)
रियान पराग – 28 षटकार (10 डाव)
जेक फ्रेजर-मॅकगर्क – 26 षटकार (7 डाव)
शिवम दुबे – 26 षटकार (11 डाव)
रिषभ पंत – 25 षटकार (12 डाव)
रजत पाटीदार – 24 षटकार (10 डाव)
या हंगामात एका डावात कोणत्या खेळाडूनं सर्वाधिक षटकार मारले, याबद्दल बोलायचं झाले तर या यादीत पहिले नाव येतं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज विल जॅक्स याचं. या यादीत टॉप 10 मध्ये 6 विदेशी खेळाडू आहेत.
विल जॅक्स – 10 षटकार
जॉनी बेयरस्टो – 9 षटकार
ट्रॅव्हिस हेड – 8 षटकार
रिषभ पंत – 8 षटकार
हेनरिक क्लासेन – 8 षटकार
महत्त्वाच्या बातम्या-
“विराट कोहलीला टी20 विश्वचषकात सलामीला खेळायला पाठवा”, सौरव गांगुलीचा टीम मॅनेजमेंटला सल्ला
कर्णधार बदलाच्या चर्चांवर लखनऊच्या मॅनेजमेंटकडून स्पष्टीकरण, केएल राहुलकडेच असणार संघाचं नेतृत्व