आशिया चषक 2023 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (17 सप्टेंबर) कोलंबो येथे खेळला जाणार आहे. भारत आणि श्रीलंका हे दोन सर्वोत्तम संघ अंतिम सामन्यात एकमेकांशी दोन हात करतील. यंदा आशिया चषक जिंकून भारतीय संघ तब्बल आठव्यांदा ही स्पर्धा आपल्या नावे करणार की यजमान श्रीलंका भारताला पछाडत सातव्यांदा आशिया चषक जिंकणार याकडे तमाम क्रिकेटप्रेमी लक्ष देऊन आहेत. या अंतिम सामन्यापूर्वी आपण स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी गोलंदाजांवर नजर टाकूया.
आशिया चषक स्पर्धेत सर्वाधिक बळी मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत श्रीलंकन गोलंदाजांचा दबदबा दिसून येतो. या यादीमध्ये श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरन हा अग्रस्थानी आहे. त्याने आशिया चषक स्पर्धेत 24 सामने खेळताना 30 बळी आपल्या नावे केलेले. त्यानंतर या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर श्रीलंकेचा माजी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगा आहे. त्याने आशिया चषकात केवळ 14 सामने खेळताना 29 टिपले आहेत. तर, तिसऱ्या क्रमांकावर देखील श्रीलंकेचा माजी फिरकीपटू अजंता मेंडिस दिसून येतो. त्याने या स्पर्धेत केवळ आठ सामने खेळताना 26 फलंदाज बाद केलेले.
या यादीमध्ये चौथ्या क्रमांकावर भारताचा रवींद्र जडेजा आहे. त्याने स्पर्धेत 19 सामने खेळताना 25 फलंदाजांना बाद केले. आशिया चषकातील सर्वात यशस्वी गोलंदाजांच्या पहिल्या पाचात तो एकमेव भारतीय आहे. तर पाकिस्तानचा सईद अजमल 25 बळींसह पाचव्या क्रमांकावर दिसून येतो.
श्रीलंकेचा चामिंडा वास 23 बळी तर श्रीलंकेचा सनथ जयसूर्या बांगलादेशचा अब्दुर रजाक व भारताचा इरफान पठाण हे प्रत्येकी 22 बळींसह पहिल्या दहामध्ये आहेत.
(Most Successful Bowlers In Asia Cup History Muralidharan Leads Jadeja Is Only Indian)
महत्वाच्या बातम्या –
रोहित-तिलकच्या निराशाजनक विकेट्स, वेगवान गोलंदाजामुळे बांगलादेशची शानदार सुरुवात
शाकिबच्या धमाक्यामुळे बांगलादेशची आव्हानात्मक धावसंख्या! भारतासाठी शार्दुल पुन्हा चमकला