रविवारी (दि. 9 ऑक्टोबर) पर्थ येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघात 3 सामन्यांच्या टी20 मालिकेतील पहिला सामना पार पडला. या सामन्यात इंग्लंडने 8 धावांनी विजय मिळवला. मात्र, असे असले, तरीही ऑस्ट्रेलियाचा धाकड फलंदाज डेविड वॉर्नर हा मात्र चांगलाच चमकला. त्याने या सामन्यात इंग्लंडच्या गोलंदाजांना चोप देत अफलातून अर्धशतक झळकावले. या अर्धशतकामुळे त्याच्या नावावर एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. यासह त्याने अनेक दिग्गज खेळाडूंना मागे टाकले आहे.
डेविड वॉर्नरचे अर्धशतक
या सामन्यात प्रथम फलंदाजीला उतरलेल्या इंग्लंड संघाने 6 विकेट्स गमावत 208 धावा चोपल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून सलामीला धाकड फलंदाज डेविड वॉर्नर (David Warner) उतरला होता. त्याने यावेळी फलंदाजी करताना अर्धशतक झळकावले. वॉर्नरने 44 चेंडूत 73 धावा केल्या. या धावा करताना त्याने 2 षटकार आणि 8 चौकार मारले. या अर्धशतकामुळे वॉर्नर पराभवाच्या टी20 सामन्यात सर्वाधिक वेळा 50 पेक्षा अधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सामील झाला. त्याने तब्बल 8 वेळा पराभवाच्या सामन्यात 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत.
विराट अव्वलस्थानी
याबाबतीत वॉर्नरने फाफ डू प्लेसिस याची बरोबरी केली आहे. डू प्लेसिस यानेही पराभूत झालेल्या सामन्यांमध्ये फलंदाजी करताना 8 वेळा 50 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. त्यामुळे दोघेही संयुक्तरीत्या दुसऱ्या स्थानी आहेत. या यादीत विराट कोहली अव्वलस्थानी आहे. विराटने पराभवाच्या टी20 सामन्यांमध्ये आतापर्यंत 10 वेळा 50 पेक्षा अधिक धावा चोपल्या आहेत. या यादीत संयुक्तरीत्या तिसऱ्या स्थानी बाबर आझम, एच मसकाद्जा आणि निकोलस पूरन या खेळाडूंचा समावेश आहे.
https://twitter.com/ICC/status/1579066237581238272
विशेष म्हणजे, आव्हानाचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्येही वॉर्नरने खास कामगिरी केली आहे. तो आव्हानाचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणारा दुसऱ्या क्रमांकाचा खेळाडू बनला आहे. त्याच्या एकूण 1768 धावा आहेत. तसेच, अव्वलस्थानी विराट कोहली असून त्याच्या 1901 धावा आहेत.
पराभवाच्या टी20 सामन्यात सर्वाधिक वेळा 50 पेक्षा अधिक धावा करणारे खेळाडू
10 वेळा- विराट कोहली
8 वेळा- डेविड वॉर्नर*
8 वेळा- फाफ डू प्लेसिस
7 वेळा- बाबर आझम
7 वेळा- एच मसकाद्जा
7 वेळा- निकोलस पूरन
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘आयपीएल खेळू नका!’, कारणे देणाऱ्या खेळाडूंना भारतीय दिग्गजाने झापले
आव्हानाचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत वॉर्नरची एन्ट्री, टेबल टॉपर फक्त ‘किंग कोहली’






