इंग्लंड क्रिकेट संघाने नुकताच पाकिस्तान संघाचा दौरा केला. या दौऱ्यात खेळण्यात आलेल्या 7 सामन्यांच्या टी20 मालिकेत इंग्लंडने 4-3ने विजय मिळवला. यानंतर इंग्लंड ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात इंग्लंडला 3 टी20 आणि 3 वनडे सामन्यांच्या मालिका खेळायचीये. यातील पहिला टी20 सामना पर्थ स्टेडिअमवर पार पडला. या सामन्यात इंग्लंडने 8 धावांनी विजय मिळवला. मात्र, ऑस्ट्रेलिया संघाचा सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर याने एक मोठा कारनामा केला आहे.
या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी पहिल्यांदा फलंदाजी करताना इंग्लंड संघाने 20 षटकात 6 विकेट्स गमावत 208 धावा चोपल्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा धडाकेबाज फलंदाज डेविड वॉर्नर याने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने 44 चेंडूत 73 धावा चोपल्या. यामध्ये 2 षटकार आणि 8 चौकारांचा समावेश होता. यासह त्याच्या नावावर एका विक्रमाची नोंद झाली आहे. वॉर्नरने टी20 क्रिकिटेमध्ये आव्हानाचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये दुसरे स्थान पटकावले आहे.
David Warner keeps Australia in the run chase 💪🏻
Watch the #AUSvENG series LIVE on https://t.co/KdZ5uXm8Gc (in select regions) 📺
Scorecard: https://t.co/SCmmTqVWJ3 pic.twitter.com/Z6ANwEW3vy
— ICC (@ICC) October 9, 2022
त्याने आयरिश क्रिकेटपटू पॉल स्टर्लिंग याला मागे टाकले आहे. पॉलने टी20 क्रिकेटमध्ये आव्हानाचा पाठलाग करताना एकूण 1731 धावा चोपल्या होत्या. आता वॉर्नरने त्याला मागे टाकत 1768 धावा केल्या. टी20 क्रिकेटमध्ये आव्हानाचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये विराट कोहली अव्वलस्थानी आहे. विराटने आतापर्यंत 1901 धावा चोपल्या आहेत. त्यानंतर चौथ्या स्थानी रोहित शर्मा आहे. रोहितने टी20त आव्हानाचा पाठलाग करताना आतापर्यंत 1461 धावा केल्या आहेत.
सामन्याबद्दल थोडक्यात
इंग्लंडने दिलेल्या 209 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलिया संघाला पार करता आले नाही. त्यांना निर्धारित 20 षटकात 9 विकेट्स गमावत 200 धावाच करता आल्या. त्यामुळे इंग्लंडने विजय मिळवत मालिकेत 1-0ने आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे, 11 वर्षांनंतर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाला ऑस्ट्रेलियात पराभूत केले आहे.
टी20त आव्हानाचा पाठलाग करताना सर्वाधिक धावा करणारे खेळाडू
1901- विराट कोहली
1768- डेविड वॉर्नर*
1731- पॉल स्टर्लिंग
1461- रोहित शर्मा
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
T20 WC: ‘भारताचे ब्लेझर घातल्यावर गर्व वाटला पण….’, चहल टीव्हीवर अर्शदीप-हुड्डाचे मोठे भाष्य
INDvSA: हेंड्रिक्स-मारक्रमच्या ‘शतकीय’ भागीदारीने दक्षिण आफ्रिकेचे भारतासमोर 278 धावांचे टारगेट