अॅडलेड। भारताची गुरुवार 6 डिसेंबरपासून चार सामन्यांची कसोटी मालिका सुरु होणार आहे. या मालिकेतील पहिला सामना अॅडलेड येथील अॅडलेड ओव्हल मैदानावर होणार आहे.
या मालिकेसाठी दोन्ही संघांची तयारी सुरु झाली आहे. तसेच भारतीय संघाला आत्तापर्यंत आॅस्ट्रेलियामध्ये एकदाही कसोटी मालिका जिंकण्यात यश आलेले नाही. त्यामुळे भारतीय संघाला पहिल्यांदाच आॅस्ट्रेलिया विरुद्ध आॅस्ट्रेलियन भूमीत कसोटी मालिका जिंकण्याची संधी आहे.
भारताने आॅस्ट्रेलिया विरुद्ध आॅस्ट्रेलियामध्ये आत्तापर्यंत गेल्या 70 वर्षात 44 कसोटी सामने खेळले आहेत. पण यापैकी भारताला फक्त पाच सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर 28 सामन्यात पराभव स्विकारावा लागला आहे आणि 11 सामने अनिर्णित राहिले आहेत.
आॅस्ट्रेलिया विरुद्ध आॅस्ट्रेलियामध्ये आत्तापर्यंत 10 संघ कसोटी सामने खेळले आहेत. यात आयसीसीच्या विश्व एकादश संघाचाही समावेश आहे. तसेच एकूण 9 देशांचे संघ आॅस्ट्रेलिया विरुद्ध आॅस्ट्रेलियामध्ये कसोटी सामने खेळले आहेत.
या दहा संघांमध्ये आॅस्ट्रेलियाच्याच भूमीत आॅस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक कसोटी सामने जिंकण्याच्या यादीत भारतीय संघ चौथ्या क्रमांकावर आहे. या यादीत इंग्लंड संघ पहिल्या क्रमांकावर असून त्यांनी 180 सामन्यांपैकी 57 सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच इंग्लंड 95 सामन्यात पराभूत झाले असून 28 सामने अनिर्णित राहिले आहेत.
त्याचबरोबर आॅस्ट्रेलियामध्ये आॅस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक विजय मिळवण्याच्या यादीत इंग्लंड पाठोपाठ विंडीजचा संघ आहे. त्यांनी 66 सामन्यांत 18 विजय 37 पराभव मिळवले आहेत. तसेच 10 सामने अनिर्णित तर 1 सामना बरोबरीत सुटला आहे.
आॅस्ट्रेलियाचा विंडीज विरुद्ध बरोबरीत सुटलेला हा कसोटी सामना आॅस्ट्रेलियाने आत्तापर्यंत मायभूमीत खेळलेल्या 415 कसोटी सामन्यांपैकी एकमेव बरोबरी झालेला कसोटी सामना आहे. हा सामना ब्रिस्बेन येथे 9-14 डिसेंबर 1960 मध्ये पार पडला होता.
या व्यतिरिक्त एकदाही आॅस्ट्रेलियाने मायभूमीत खेळलेला कसोटी सामना बरोबरीत सुटलेला नाही.
तसेच आॅस्ट्रेलियाच्या मायभूमीत आॅस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक विजय मिळवण्याच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका असून त्यांनी 41 सामन्यात 10 विजय आणि 21 पराभव स्विकारले आहेत. तसेच 10 सामने अनिर्णित राहिले आहेत.
त्याचबरोबर आॅस्ट्रेलियात आॅस्ट्रेलियाविरुद्ध बांगलादेश, श्रीलंका, झिम्बाब्वे आणि आयसीसी विश्वएकादश संघाला एकदाही कसोटी विजय मिळवता आलेला नाही.
आॅस्ट्रेलियन भूमीत आॅस्ट्रेलिया विरुद्ध सर्वाधिक विजय मिळवणारे संघ-
57 विजय – इंग्लंड (सामने – 180 पराभव- 95 अनिर्णित – 28 )
18 विजय – विंडीज (सामने – 66 पराभव- 37 अनिर्णित – 10 बरोबरी – 1)
10 विजय – दक्षिण आफ्रिका (सामने – 41 पराभव- 21 अनिर्णित – 10 )
5 विजय – भारत (सामने – 44 पराभव- 28 अनिर्णित – 11 )
4 विजय – पाकिस्तान (सामने – 35 पराभव- 24 अनिर्णित – 7)
3 विजय – न्यूझीलंड (सामने – 31 पराभव- 17 अनिर्णित – 11)
0 विजय – बांगलादेश (सामने – 2 पराभव- 2)
0 विजय – आयसीसी विश्व एकादश (सामने – 1 पराभव- 1)
0 विजय – श्रीलंका (सामने – 13 पराभव- 11 अनिर्णित – 2)
0 विजय – झिम्बाब्वे (सामने – 2 पराभव- 2)
महत्त्वाच्या बातम्या:
–भारत विरुद्धच्या सामन्याआधी या ऑस्ट्रेलियन फलंदाजाला बसला मोठा धक्का
–टीम इंडियाला आॅस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटी मालिकेआधी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मोलाचा सल्ला…
–मिताली राजच्या अडचणीत वाढ; कर्णधार हरमनप्रीत कौर, स्म्रीती मानधनाने केला मोठा खूलासा
–ऑस्ट्रेलिया विरुद्ध विराट कोहलीला हा खास विक्रम करण्याची संधी