---Advertisement---

राजस्थान दुसऱ्यांदा खेळणार IPL फायनल! पाहा सर्वाधिकवेळा अंतिम सामना खेळणाऱ्या संघांची संपूर्ण यादी

On: शनिवार, मे 28, 2022 4:04 PM
Rajasthan-Royals
---Advertisement---

अहमदाबाद। इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात क्वालिफायर दोनचा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात झाला. शुक्रवारी (२७ मे) नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या सामन्यात राजस्थानने ७ विकेट्सने विजय मिळवला आणि अंतिम सामन्यात प्रवेश केला. त्यामुळे आता राजस्थान तब्बल १४ वर्षांनी आयपीएलचा अंतिम सामना खेळताना दिसणार आहे. 

राजस्थानने (Rajasthan Royals) याआधी २००८ साली शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली आयपीएलचा अंतिम सामना खेळला होता. त्यावेळी त्यांनी एमएस धोनीच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) पराभूत करत पहिला आयपीएल विजेता (IPL Winner) होण्याचा मान पटकावला होता. पण त्यानंतर १४ वर्षे राजस्थानला अंतिम सामना (IPL Final) गाठण्यात अपयश आले. अखेर ही प्रतिक्षा शुक्रवारी संपली आणि राजस्थानने अंतिम सामन्यात प्रवेश केला.

राजस्थानची आयपीएलचा अंतिम सामना खेळण्याची ही दुसरीच वेळ असणार आहे. तर त्यांचा सामना ज्या संघाविरुद्ध होणार आहे, तो गुजरात टायटन्स (Gujarat Titans) पहिल्यांदाच आयपीएलचा अंतिम सामना खेळणार आहे. विशेष गोष्ट अशी की, गुजरातसाठी हा पहिलाच आयपीएल हंगाम आहे.

असे असले तरी, गेल्या १५ वर्षांत सर्वाधिकवेळा अंतिम सामना खेळणाऱ्या संघाबद्दल विचार करायचे झाल्यास अव्वल क्रमांकावर चेन्नई सुपर किंग्स संघ आहे. त्यांनी ९ वेळा आयपीएलचा अंतिम सामना खेळला आहे. तसेच मुंबईने ६ वेळा आयपीएल अंतिम सामना खेळला आहे. त्यापाठोपाठ कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ आहेत. त्यांनी प्रत्येकी तीनवेळा आयपीएलचा अंतिम सामना खेळला असून सनरायझर्सने दोन वेळा अंतिम सामन्यात प्रवेश केला होता.

याशिवाय दिल्ली कॅपिटल्स, डेक्कन चार्जर्स, पंजाब किंग्स, गुजरात टायटन्स आणि रायझिंग पुणे सुपर जायंट्स या संघांनी प्रत्येकी एकदा आयपीएलच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे (Most times reaching the final in IPL).

तसेच आयपीएलमध्ये आत्तापर्यंत मुंबईने सर्वाधिक ५ विजेतेपद जिंकले असून, चेन्नईने ४ विजेतेपद जिंकले आहेत. तसेच कोलकाताने २ वेळा विजेतेपद पटकावले आहे. त्याचबरोबर डेक्कन चार्जर्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांनी देखील प्रत्येकी एकवेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे.

आता आयपीएलच्या १५ व्या हंगामाचा अंतिम सामना रविवारी (२९ मे) नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या – 

आयसीसीचे अध्यक्षही आहेत आयपीएलचे मोठे चाहते, पण ‘या’ गोष्टीची वाटतेय चिंता

सलग ३ षटकार देत हुकवली होती मोठी संधी, आता तोच प्रसिद्ध कृष्णा बनला राजस्थानच्या विजयाचा हिरो

आठवण वॉर्नची! १४ वर्षांनी IPL फायनलमध्ये गेल्यानंतर राजस्थानच्या बटलर, सॅमसनची भावूक प्रतिक्रिया; म्हणाले…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---