आयपीएल २०२१ ला येत्या ९ एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगलोर आमने-सामने येणार आहेत. या सामन्या दरम्यान तसेच संपूर्ण आयपीएल दरम्यान अनेक रेकॉर्ड्स मोडले जाण्याची शक्यता आहे.
याच निमित्ताने या लेखात आपण आयपीएल इतिहासातील काही रेकॉर्ड्स जाणून घेऊया. आयपीएल मध्ये एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक धावा आणि सर्वाधिक विकेट्स घेणार्या खेळाडूंच्या रेकॉर्ड्स बद्दल यात जाणून घेऊया.
एकाच आयपीएल संघाविरुद्ध सर्वाधिक धावा –
आयपीएल इतिहासात एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक धावा करणार्या फलंदाजांच्या यादीत स्टार फलंदाज रोहित शर्मा अव्वलस्थानी आहे. त्याने कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध तब्बल ९३९ धावा काढल्या आहेत. रोहित नंतर या यादीत डेव्हिड वॉर्नरचा क्रमांक असून त्याच्याही धावा कोलकाताच्याच संघाविरुद्ध आहेत. या यादीत विराट कोहली, एमएस धोनी आणि सुरेश रैना या दिग्गज फलंदाजांचाही समावेश आहे.
१) ९३९ – रोहित शर्मा – वि. कोलकता नाईट रायडर्स
२) ९१२ – डेव्हिड वॉर्नर – वि. कोलकाता नाईट रायडर्स
३) ९०६ – डेव्हिड वॉर्नर – वि. किंग्ज इलेव्हन पंजाब
४) ८९७ – विराट कोहली – वि. दिल्ली कॅपिटल्स
५) ८८७ – विराट कोहली – वि. चेन्नई सुपर किंग्ज
६) ८२३ – एमएस धोनी – वि. रॉयल चॅलेंजर्स बंगलोर
७) ८१८ – सुरेश रैना – वि. कोलकाता नाईट रायडर्स
८) ८१८ – सुरेश रैना – वि. मुंबई इंडियन्स
९) ८१८ – रोहित शर्मा – वि. दिल्ली कॅपिटल्स
१०) ८१४ – सुरेश रैना – वि. किंग्ज इलेव्हन पंजाब
एकाच आयपीएल संघाविरुद्ध सर्वाधिक विकेट्स –
आयपीएल इतिहासात एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या यादीत मुंबई इंडियन्सचा लसिथ मलिंगा अव्वल स्थानी आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्जच्या संघाविरुद्ध ३१ विकेट्स घेतल्या आहेत. त्यानंतर अमित मिश्रा दुसर्या स्थानी आहे. याशिवाय उमेश यादव, ड्वेन ब्राव्हो, सुनील नरिन याही गोलंदाजांचा समावेश आहे.
१) ३१ – लसिथ मलिंगा – वि. मुंबई इंडियन्स
२) ३० – अमित मिश्रा – वि. राजस्थान रॉयल्स
३) २९ – उमेश यादव – वि. किंग्ज इलेव्हन पंजाब
४) २८ – ड्वेन ब्राव्हो – वि. मुंबई इंडियन्स
५) २८ – सुनील नरिन – वि. किंग्ज इलेव्हन पंजाब
६) २७ – भुवनेश्वर कुमार – वि. कोलकाता नाईट रायडर्स
७) २५ – पियुष चावला – वि. मुंबई इंडियन्स
८) २५ – हरभजन सिंग – वि. दिल्ली कॅपिटल्स
९) २४ – हरभजन सिंग – वि. चेन्नई सुपर किंग्ज
महत्त्वाच्या बातम्या –
धोनीविषयी प्रश्न विचारताच ‘असे’ दिले संजू सॅमसनने उत्तर
आजपर्यंत आयपीएलमध्ये अनेक परदेशी खेळाडू खेळले, पण ‘हा’ कारनामा करणारा एबी डिविलियर्स एकमेवच
आयपीएल २०२१ साठी बंगलोरच्या ताफ्यात ‘या’ खास व्यक्तीची झाली नेमणूक