---Advertisement---

स्टेन गन धडाडली! कसोटी क्रिकेटमध्ये केला अजब कारनामा

On: शुक्रवार, फेब्रुवारी 15, 2019 2:33 PM
---Advertisement---

डर्बन | दक्षिण आफ्रिका विरुद्ध श्रीलंका पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या डेल स्टेनने एक खास विक्रम केला आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत त्याने स्टुअर्ट ब्राॅडसह ७व्या स्थानी झेप घेतली आहे.

श्रीलंकेच्या पहिल्या डावात ४ विकेट्स घेत त्याने हा पराक्रम केला. ९२ कसोटी सामन्यात स्टेनने २२.७२च्या सरासरीने ४३७ विकेट्स घेतल्या आहेत. तर स्टुअर्ट ब्राॅडने १२६ कसोटीत २९.०५च्या सरासरीने ४३७च विकेट्स घेतल्या आहेत. यामुळे दोघांच्याही विकेट्स सारख्याच झाल्या आहेत.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा ५वा वेगवान गोलंदाज-

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या वेगवान गोलंदाजांच्या यादीत तो पाचव्या स्थानी आला आहे. या यादीत जिमी अॅंडरसन(५७५), ग्रेल मॅकॅग्रा (५६३), कर्टनी वाॅल्श(५१९), स्टुअर्ट ब्राॅड (४३७) आणि स्टेन (४३७) यांचा समावेश झाला.

कपिलचाही विक्रम मोडला-

आज जेव्हा स्टेनने ओशाडा फ्रनांडोला बाद केले तेव्हा त्याने कसोटी क्रिकेटमध्ये एकेकाळी सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या कपिल देव यांचा विक्रम मोडला. कपिल देव यांच्या नावावर १३१ कसोटी सामन्यात २९.६४च्या सरासरीने ४३४ विकेट्सची नोंद आहे.

यामुळे ते या यादीत आता ९व्या स्थानी गेले आहेत. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टाॅप १० गोलंदाजांत आता अनिल कुंबळे (६१९) तिसऱ्या तर कपिल देव (४३४) हे ९व्या असे दोनच भारतीय गोलंदाज राहिले आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment