कोलकता। भारत विरुद्ध विंडीज संघात रविवारी (4 नोव्हेंबर) पहिला टी20 सामना पार पडला या सामन्यात भारताने विंडीजवर 5 विकेट्सने विजय मिळवला. या विजयाबरोबरच भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्माच्या नावावर खास विक्रम झाला आहे.
आंतरराष्ट्रीय टी20 क्रिकेटमध्ये रोहितचा कर्णधार म्हणून हा 9 वा विजय होता. रोहितने आत्तापर्यंत 10 टी20 सामन्यात भारताचे नेतृत्व केले आहे. या 10 सामन्यांमध्ये रोहितला फक्त एक पराभव स्विकारावा लागला आहे.
त्यामुळे रोहित आता कर्णधार म्हणून पहिल्या 10 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये सर्वाधिक सामने जिंकणारा खेळाडू ठरला आहे.
त्याआधी हा विक्रम शोएब मलिक, मायकल क्लार्क, असघर अफगाण आणि सर्फराज अहमद यांच्या नावावर विभागुन होता. या चौघांनीही कर्णधार म्हणून पहिल्या 10 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यांमध्ये 8 विजय मिळवले आहेत.
तसेच आॅस्ट्रेलियाचा माजी उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरने आॅस्ट्रेलियाचे 9 टी20 सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे. यातील त्याने 8 सामने जिंकले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या:
–पहिल्या टी२० सामन्यात टीम इंडियाचा विंडिजवर ५ विकेट्सने विजय
–दिनेश कार्तिकने संगकाराला टाकले मागे; धोनीचाही विक्रम आहे धोक्यात