---Advertisement---

त्या व्हिडिओमुळे विराट कोहली-अनुष्का शर्मा अडचणीत

On: रविवार, जून 17, 2018 3:25 PM
---Advertisement---

भारताचा कर्णधार विराट कोहलीने शनिवारी त्याची पत्नी अनुष्का शर्माचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला होता. परंतू त्या व्हिडिओमुळे आता हे दोघे अडचणीत आले आहेत.

विराटने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये अनुष्का कारमध्ये आहे आणि ती दुसऱ्या कारमध्ये असलेल्या व्यक्तीला विचारत आहे की ” तूम्ही रस्त्यावर कचरा का टाकला? थोडी काळजी घ्या. तूम्ही असे प्लॅस्टीक रस्त्यावर फेकू शकत नाही. त्यासाठी डस्बिनचा वापर करा.”

या व्हिडिओ बरोबर विराटने ट्विट केले होते की ‘बघा हे लोक कचरा रस्त्यावर फेकत आहेत. लक्झरी कारमध्ये प्रवास करत असुनही बुद्धीचा वापर करत नाही. हे लोक आपला देश स्वच्छ ठेवतील?’

‘जर तूम्हाला अशाप्रकारे कोणी चुकीचे करताना आढळले तर अनुष्काने जसे केले तसे करा आणि जागृकता निर्माण करा.’

https://twitter.com/imVkohli/status/1007952358310055937

पण या प्रकारानंतर अनुष्का दुसऱ्या कारमधील ज्या व्यक्तीला स्वच्छतेबद्दल सांगत होती तो व्यक्ती सर्वांसमोर आला आहे. त्याचे नाव आरहान सिंग आहे. त्याने इंस्टाग्रामवरुन त्याच्या  निष्काळजीपणाबद्दल माफी मागितली असली तरी त्याने विराट-अनुष्काच्या कठोर वागण्याच्या विरोधात आवाज उठवला आहे.

https://www.instagram.com/p/BkFpknoFktw/?taken-by=arhhansingh

त्याच बरोबर आरहानची आई गीतांजली एलिझाबेथनेही इंस्टाग्रामवरुन विराट-अनुष्कावर पब्लिसिटीसाठी हे सर्व केल्याचा आरोप केला आहे.

https://www.instagram.com/p/BkGNa-jA_hS/?taken-by=gittanjali.elizabeth

याबरोबरच विराटने तो व्हिडिओ शेअर केल्यानंतर त्याला ट्विटरवर संमिश्र प्रतिक्रिया आल्या होत्या. काहींनी त्याचे कौतुक केले होते तर काहींनी त्याला ट्रोल केले आहे.

https://twitter.com/idiot_troy/status/1007960184579166209

https://twitter.com/Hemantkhokhar1/status/1007955299540455425

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment