---Advertisement---

MPL: थरारक सामन्यात नाशिक टायटन्सचा विजय, छत्रपती संभाजी किंग्सचे प्रयत्न पडले तोकडे

On: शुक्रवार, जून 16, 2023 6:39 PM
---Advertisement---

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र प्रीमियर लीग (एमपीएल 2023) च्या दुसऱ्या सामन्यात ईगल नाशिक टायटन्स संघाने छत्रपती संभाजी किंग्सचा 4 धावांनी पराभव केला. पावसाच्या व्यत्ययामुळे लांबलेल्या या सामन्यात नाशिकचा युवा अष्टपैलू अर्शिन कुलकर्णी याने शानदार कामगिरी केली.

गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर झालेल्या सामन्यात नाशिक संघाला प्रथम फलंदाजीची संधी मिळाली. अनुभवी हर्षद खडीवाले व युवा अर्शिन कुलकर्णी यांनी संघाला शानदार सुरुवात देत 99 धावांची भागीदारी केली. अर्शिनने 34 चेंडूवर 60 धावा केल्या. तो बाद झाल्यानंतर मधली फळी ढेपाळली. खडीवालेने 43 धावा केल्या. कर्णधार राहुल त्रिपाठी हा या सामन्यात अपयशी ठरला. त्याचवेळी पावसाने व्यत्यय आणल्यामुळे खेळ काहीसा थांबला. अखेरच्या चार षटकात कौशल तांबे व धनराज शिंदे यांनी आक्रमक फटकेबाजी करत संघाचा डाव 195 पर्यंत पोहोचवला.

या धावांचा पाठलाग करताना छत्रपती संभाजी किंग्स संघाच्या डावात तब्बल पाच वेळा पावसाने बाधा आणली. त्यामुळे त्यांना डकवर्थ लुईस नियमानुसार 15 षटकात 157 धावांचे आव्हान मिळाले. सलामीवीर सौरभ नवले (46) व मुर्तझा ट्रंकवाला (35) यांनी संघाला दमदार सलामी दिली. 3 षटकात 48 धावांची गरज असताना कर्णधार राजवर्धन हंगरगेकर याने तीन षटकारांच्या मदतीने 21 धावा करून संघाला सामन्यात पुनरागमन करून दिले. अखेरच्या षटकात 16 धावांची गरज असताना अर्शिन कुलकर्णी याने रणजित निकमला रोखत आपल्या संघाला विजय मिळवून दिला.

बातमी अपडेट होत आहे

(MPL 2023 Eagle Nashik Titans Beat Chhatrapati Sambhaji Kings By 4 Runs Arshin Kulkarni Shines Rajvardhan Hangargekar Fight)

महत्वाच्या बातम्या-
चेतन शर्मा पुन्हा बनले निवडकर्ते! IPLच्या फ्लॉप खेळाडूला बनवून टाकलं संघाचा कर्णधार, वाचाच
Ashes मध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे पाच गोलंदाज, यादीतील दोघांनी घेतलाय जगाचा निरोप

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---