महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएल 2023 च्या प्ले ऑफमध्ये मंगळवारी (27 जून) पुणेरी बाप्पा विरुद्ध ईगल नाशिक टायटन्स हा एलिमिनेटर सामना खेळला जाईल. या सामन्यात विजेता होणार संघ दुसऱ्या क्वालिफायर सामन्यात कोल्हापूर टस्कर्स संघाशी दोन हात करेल. या सामन्यात विजेता होणारा संघ अंतिम फेरीत खेळेल.
पुणेरी बाप्पा संघाचा विचार केला गेल्यास संघाने पहिले दोन सामने मोठ्या फरकाने जिंकत जबरदस्त सुरुवात केली होती. ऋतुराज गायकवाड व पवन शहा या सलामी जोडीने या दोन्ही सामन्यात आक्रमक खेळ दाखवलेला. तर गोलंदाजीत पियुष साळवी व सचिन भोसले यांनी विरोधी संघांना जखडून ठेवले. असे असले तरी पुढील तीन सामन्यात पुणे संघाला नजीकचा पराभव पत्करावा लागला. त्यामुळे त्यांनी चौथ्या स्थानी राहत प्ले ऑफ्स गाठले.
दुसरीकडे नाशिक संघाने विजयाची हॅट्रिक केलेली. राहुल त्रिपाठीच्या नेतृत्वातील या संघाने पुढील दोन सामन्यातही चांगला खेळ दाखवला मात्र त्यांना विजय मिळवता आला नाही. अर्शिन कुलकर्णी, धनराज शिंदे, समाधान पांगारे व प्रशांत सोलंकी या खेळाडूंचे संघाच्या आतापर्यंतच्या प्रवासात मोठे योगदान राहिले आहे. एलिमिनेटर सामन्यात पुणे संघाला पराभूत करण्यासाठी या खेळाडूंना पुन्हा एकदा आपला फॉर्म कायम ठेवावा लागेल.
पुणेरी बाप्पा संभावित प्लेईंग इलेव्हन- पवन शाह, ऋतुराज गायकवाड (कर्णधार), श्रीपाद निंबाळकर, यश क्षीरसागर, सुरज शिंदे, रोहन दामले, वैभव चौगुले, शुभम कोठारी, शुभम तैस्वाल, पियुष साळवी, सचिन भोसले.
ईगल नाशिक टायटन्स संभावित प्लेईंग इलेव्हन- अर्शिन कुलकर्णी, मंदार भंडारी, सिद्धेश वीर, राहुल त्रिपाठी (कर्णधार), धनराज शिंदे, कौशल तांबे, रिषभ करवा, आदित्य राजहंस, प्रशांत सोलंकी, समाधान पांगारे, अक्षय वायकर.
(MPL 2023 Eliminator Puneri Bappa Vs Eagle Nashik Titans)
अधिक वाचा –
– एकच नंबर..! आपल्या पुण्यात होणार वर्ल्डकपचे 5 सामने, जाणून घ्या गहुंजेवर होणाऱ्या सामन्यांचे वेळापत्रक
– याला म्हणतात वचक! फायनलला गेला तरी महाराष्ट्रात येणार नाही पाकिस्तान संघ, असं केलं नियोजन