पुणे। महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या वतीने आयोजित महाराष्ट्र प्रीमिअर लीग क्रिकेट स्पर्धेत पहिल्या सामन्यात पुणेरी बाप्पा संघाकडून पराभव स्वीकाराव्या लागणाऱ्या कोल्हापूर टस्कर्स संघाला तिसऱ्या दिवशी शनिवारी (दि. 17 जून) होणाऱ्या रत्नागिरी जेट्स संघाविरुद्धच्या लढतीत चांगली कामगिरी करून पुनरागमन करण्याची संधी असणार आहे.
एमपीएल स्पर्धेतील सर्वात तडाखेबंद अशी फलंदाजी कोल्हापूर टस्कर्स (Kolhapur Tuskers) संघाकडे असली तरी मात्र कालच्या लढतीत या संघाकडून अंकित बावणे (Ankit Bawane) याने एकाबाजूने लढताना 57चेंडूत 72धावांची खेळी केली होती. कोल्हापूर टस्कर्सचा कर्णधार केदार जाधव व स्पर्धेतील सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या नौशाद शेख यांनादेखील आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करण्याची संधी असणार आहे.
याचबरोबर कोल्हापुर संघामध्ये साहिल औताडे, तरणजीत सिंग धिल्लन, सचिन धस,अक्षय दरेकर यांचा देखील समावेश आहे. पहिल्या सामन्यात पुणेरी बाप्पा संघाविरुद्ध कोल्हापूर टस्कर्स संघाने उभे केलेले 144 धावांचे आव्हान पुरेसे ठरले नाही. या सामन्यातील गोलंदाजी संघासाठी फारशी उपयुक्त ठरली नाही व याचाच फायदा घेत पुणेरी बाप्पा संघाने 8 विकेट्सने सहज विजय मिळवला.
दुसऱ्या बाजूला रत्नागिरी जेट्स (Ratnagiri Jets) संघ शुक्रवारी सोलापूर रॉयल्स संघाविरुद्ध आपला सलामीचा सामना खेळला. यात त्यांनी सोलापूरला 5 विकेट्सने पराभूत केले. आता रत्नागिरी संघ शनिवारी कोल्हापूर टस्कर्स विरुद्ध रात्री आठ वाजता दुसरा सामना खेळणार आहे. (MPL 2023 Kolhapur look to bounce back against Ratnagiri)
महत्वाच्या बातम्या-
W,W,W,W,W,W : ‘या’ गोलंदाजाने 6 चेंडूत घेतल्या सलग 6 विकेट्स, एकाच षटकात डबल हॅट्रिक घेऊन रचला इतिहास
रत्नागिरी जेट्सचा सोलापूर रॉयल्सला धोबीपछाड! सांघिक कामगिरीच्या जोरावर मिळवला शानदार विजय