---Advertisement---

आज मिळणार MPL चा महाविजेता! रत्नागिरी-कोल्हापूर अंतिम सामन्यात झुंजणार

On: गुरूवार, जून 29, 2023 11:49 AM
---Advertisement---

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएल 2023 स्पर्धेचा अंतिम सामना गुरुवारी (29 जून) खेळला जाईल. गहुंजे येथील एमसीए स्टेडियमवर हा सामना खेळला जाईल. गुणतालिकेत पहिल्या दोन स्थानी राहिलेल्या रत्नागिरी जेट्स व कोल्हापूर टस्कर्स यांच्या दरम्यानच हा सामना सायंकाळी पार पडेल.

तब्बल बारा वर्षाच्या कालावधीनंतर ही स्पर्धा केली गेली होती. यामध्ये सहा संघाने सहभाग नोंदवला. तसेच खेळाडूंच्या लिलावातून तब्बल 128 खेळाडू या संघांमध्ये सामील झाले. साखळी फेरीचे पंधरा सामने पार पडल्यानंतर चार संघांनी प्ले ऑफमध्ये प्रवेश केला होता. पहिल्या क्वालिफायरमध्ये रत्नागिरी संघाने कोल्हापूरचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केलेला. एलिमिनेटरमध्ये पुणेरी बाप्पा संघाने नाशिक टायटन्सला पराभूत करत क्वालिफायर दोन खेळण्याचा मान मिळवला. क्वालिफायर दोनमध्ये कोल्हापूरने पुणेरी बाप्पावर एकतर्फी विजय मिळवत अंतिम फेरी गाठली.

अझीम काझी याच्या नेतृत्वातील रत्नागिरी संघ स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरी करत आला आहे. फलंदाजीत स्वतः काझी, धीरज फटांगरे, प्रीतम पाटील व निखिल नाईक यांनी योगदान दिले आहे. तर गोलंदाजीत विजय पावले, कुणाल थोरात व प्रदीप दाढे विशेष कामगिरी करताना दिसले. अष्टपैलू दिव्यांग हिंगणेकर याने संघाची ताकद वाढवली आहे.

दुसरीकडे कोल्हापूर संघासाठी अनुभवी अंकित बावणे यांनी फलंदाजीची धुरा खांद्यावर घेतलेली दिसते. त्याला कर्णधार केदार जाधव, सिद्धार्थ म्हात्रे, साहिल औताडे व नौशाद शेख यांनी वेळोवेळी साथ दिली आहे. अष्टपैलू तरणजीत धिल्लॉं याच्यासह गोलंदाज निहाल तुसामद, श्रेयस चव्हाण यांनी सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. संघाला पुन्हा एकदा याच खेळाडूंकडून अखेरच्या वेळी चांगल्या कामगिरीची अपेक्षा असेल.

(MPL 2023 Kolhapur Tuskers Take Ratnagiri Jets In Finals)

महत्वाच्या बातम्या
पुणेरी बाप्पा Qualifier 2 मधून आऊट, कोल्हापूर टस्कर्सला मिळालं फायनलचं तिकीट
बुमराह कधी करणार पुरनागमन? विश्वचषकाचे वेळापत्रक येताच समोर आली मोठी अपडेट

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---