महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन आयोजित महाराष्ट्र प्रीमियर लीग म्हणजेच एमपीएल 2023 चे साखळी सामने शनिवारी (24 जून) समाप्त झाले. पंधरा साखळी सामन्यांच्या समाप्तीनंतर प्ले ऑफ्स खेळणारे चार संघ निश्चित झाले असून, या संघांमध्ये पुढील सामने पार पडतील. विशेष म्हणजे एमपीएलमध्ये देखील आयपीएल प्रमाणेच प्ले ऑफ्सचे सामने खेळले जाणार आहेत.
स्पर्धेच्या सुरुवातीनंतर पुणेरी बाप्पा व ईगल नाशिक टायटन्स हे संघ पहिल्या दोन क्रमांकावर असतील अशी अनेकांची अपेक्षा होती. मात्र, सुरुवातीला पराभव पाहूनही प्रत्येकी चार विजय मिळवत रत्नागिरी जेट्स व कोल्हापूर तस्कर यांनी पहिले व दुसरे स्थान पटकावले. त्यामुळे क्वालिफायर एकचा सामना या दोन संघांमध्ये खेळला जाईल. 26 जून रोजी होणाऱ्या या सामन्यातील विजेता थेट अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे.
स्पर्धेतील सर्वात मजबूत संघ म्हणून पहिल्या तीन सामन्यात ईगल नाशिक टायटन्स संघाने विजय मिळवले होते. मात्र राहुल त्रिपाठीच्या नेतृत्वातील या संघाला पुढील दोन सामन्यात पराभूत व्हावे लागले. सलग दोन विजय मिळवत स्पर्धेत दणदणीत सुरुवात करणाऱ्या पुणेरी बाप्पा संघालाही त्यानंतर तीन सामन्यात पराभव पत्करावा लागला. असे असले तरी ते प्ले ऑफसाठी पात्र ठरले. तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकावर असलेल्या या संघांदरम्यान एलिमिनेटर सामना होईल. या सामन्यात पराभूत झालेल्या संघ स्पर्धेतून बाहेर होईल.
क्वालिफायर एकमध्ये पराभूत झालेला संघ व एलिमिनेटर सामन्यात विजय मिळवलेला संघ यांच्या दरम्यान क्वालिफायर दोनचा सामना खेळला जाईल. या सामन्यात विजय मिळवणारा संघ अंतिम फेरीत प्रवेश करेल. अंतिम सामना 29 जून रोजी होईल. हे सर्व सामने सायंकाळी आठ वाजता गहुंजे येथील एमसीए स्टेडियमवर पार पडतील.
(MPL 2023 PlayOffs Schedule Kolhapur Tuskers And Nashik Titans Play Qualifier One)
महत्वाच्या बातम्या-
MPL: कोल्हापूर टस्कर्सचा नाशिक टायटन्सवर दणदणीत विजय! मनोज-अंकित विजयाचे शिल्पकार
भारतीय संघाच्या पहिल्या विश्वविजेतेपदाची 40 वर्षे