महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेची यावर्षी पुन्हा सुरुवात केली. लीगमध्ये आतापर्यंत 10 सामना खेळले गेले आहेत. गुरुवारी 11 आणि 12 वा सामना खेळला जाईल. पुणेरी बाप्पा आणि सोलापूर रॉयल्स संघ गुरुवारी सायंकाळी एकमेकांशी भिडणार आहेत. पुणेरी बप्पा संघाकडे या सामन्यानंत विजय मिळवून प्लेऑफमध्ये जागा बनवण्याची संधी असेल.
पुणेरी बाप्पा (Puneri Bappa ) संघ बुधवारी (21 जून) गुणतालिकेत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर दुसरीकडे सोलापूर रॉयल्स संघ मात्र गुणतालिकेत सर्वात शेवटची सहाव्या क्रमांकावर आहे. पुणेरी बाप्पाने पहिल्या तीन पैकी दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. तर गुजरात संघाला तीन पैकी तिन्ही सामन्यांमध्ये पराभव स्वीकारला आहे. पुणेरी बाप्पा संघ हंगामातील आपल्या चौथ्या सामन्यात विजय मिळवेल, अशी चाहत्यांची अपेक्षा आहे. गुरुवारी जर पुणेरी बाप्पा संघ सोलापूर रॉयल्सविरुद्ध जिंकला, तर त्यांचा संघ प्लेऑफमध्ये आपली जागा जवळपास पक्की करेल. प्लेऑफचे तिकिट पक्के करण्यासाठी पुण्याचे खेळाडू नेट्समध्ये चांगलाच घाम गाळत आहेत.
एकंदरीत पाहता पुणेरी बाप्पा संघाचे प्रदर्शन आतापर्यंत जबरदस्त म्हणता येईल. हंगामातील पहिल्या तीन सामन्यांमध्ये पुणेरी बाप्पा संघाकडून खेळाडूंनी एकूण चार अर्धशतके केली आहेत. कर्णधार ऋतुराज गायकवाड (Ruturaj Gaikwad) आणि पवन शहाने यांच्या नावावर प्रत्येक दोन-दोन अर्धशतके आहेत. पुणेरी बाप्पासाठी ऋतुराजने आतापर्यंत सर्वाधिक 143 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 71.5 राहिली आहे. पवन शहानेने तीन सामन्यांमध्ये 47 च्या सरासरीने 141 धावा केल्या आहेत. यश क्षीरसागर पुणे संघासाठी तिसरा सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. तीन सामन्यांमध्ये यशने 42च्या सरसारीने 84 धावा केल्या आहेत.
https://www.instagram.com/reel/CtwkmjSNFz8/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MWQ1ZGUxMzBkMA==
गोलंदाजी विभागाच विचार केला, तर पियुष साळवी याने सर्वाधिक 8 विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याची सरासरी 10.38 राहिली आहे. सचिन भोसले याने 17च्या सरासरीने तीन सामन्यांमध्ये 5 विकेट्स गेतल्या आहेत आणि तो पुणे संघाचा दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. यादीत तिसरा क्रमांक रोहन दामले आहे, ज्याने तीन सामन्यांमध्ये 19 च्या सरासरीने 5 विकेट्स घेतल्या आहेत. पुणेरी बाप्पा आणि सोलापूर रॉयल्स यांच्यातील सामन्याआधी गुरुवारी दुपारी छत्रपती संभाजी किंग्ज आणि कोल्हापूर टस्कर्स यांच्यात लढत होईल. (MPL 2023 The match between Puneri Bappa vs Solapur Royals will be crucial for the playoffs)
महत्वाच्या बातम्या –
धोनीची रणनीती वापरल्यामुळे पहिल्या ऍशेस सामन्यात इंग्लंडला फायदा! स्टोक्सकडून भारतीय दिग्गजाचे अनुकरण
एमएस धोनी-रविंद्र जडेजात खरंच वाद आहे? सीएसकेच्या प्रमुख अधिकाऱ्याकडून समजले सत्य