---Advertisement---

MPL 2025 ची धमाकेदार सुरुवात, उद्घाटन सोहळ्यात चित्रांगदा सिंगचा जलवा

On: बुधवार, जून 4, 2025 7:48 PM
---Advertisement---

महाराष्ट्र प्रिमियर लीग 2025 ला सुरुवात झाली आहे. गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर बुधवारी (4 जून) स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा पार पडला. अनेक लाईव्ह परफॉर्मन्सने या सोहळ्याला चार चांद लावले. बॉलिवूड अभिनेत्री चित्रांगदा सिंग तिच्या डान्स परफॉर्मन्सने उपस्थितांची मने जिंकली.

एमसीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या या उद्घाटन सोहळ्यात सुरुवातीला ड्रोन शो आयोजित केला गेला होता. या सोहळ्यासाठी प्रसिद्ध होस्ट शेफाली बग्गा हिला आमंत्रित केले गेले होते. सोहळ्यात जगप्रसिद्ध 5 युनिटी क्रू या डान्स ग्रुपने आपला परफॉर्मन्स सादर केला. यानंतर या संपूर्ण उद्घाटन सोहळ्याचे खास आकर्षण असलेल्या अभिनेत्री चित्रांगदा सिंग तिने आपला नृत्यविष्कार सादर केला. देसी बॉयज, लाल छडी व कातिलाना या बॉलीवूड सॉंगवर तीने ठुमके लगावले. अखेर जय हो या ऍंथम सॉंगने तिने आपला परफॉर्मन्स पूर्ण केला.

एमसीए अध्यक्ष रोहित पवार यांच्या उपस्थितीत यानंतर उद्घाटन सोहळ्याची अखेर झाली. तत्पूर्वी, सहभागी सर्व सहा संघांचे कर्णधार व संघ मालक उपस्थित होते. फटाक्यांच्या आतिषबाजीत एमपीएल 2025 ची सुरुवात होत असल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले. या सोहळ्यासाठी रोहित पवार यांच्यासह महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

स्पर्धेच्या उद्घाटनाच्या सामन्याची नाणेफेक ईगल नाशिक टायटन्स संघाने जिंकली. त्यांनी रत्नागिरी जेट्स संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---