पुणे, 20 जुलै। पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कल व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटना यांच्या वतीने व अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या व एमपीएल प्रायोजित लाभले असून अमानोरा व एच2इ सिस्टीम सहप्रायोजित एमपीएल 51व्या राष्ट्रीय ज्युनियर ओपन (19 वर्षांखालील) आणि 36व्या राष्ट्रीय ज्युनियर (19 वर्षांखालील) बुद्धिबळ चॅम्पियनशिप 2022 स्पर्धेत मुलींच्या गटात तामिळनाडूच्या रक्षिता रवी हिने, तर मुलांच्या गटात राजस्थानच्या व्रशांक चौहान या खेळाडूंनी अव्वल क्रमांक पटकावत विजेतेपद संपादन केले.
पीवायसी हिंदू जिमखाना, पुणे येथे पार पडलेल्या या स्पर्धेत अकराव्या फेरीअखेर मुलींच्या गटात तामिळनाडूच्या महिला आंतरराष्ट्रीय मास्टर रक्षिता रवी हिने 9.5गुणांसह अव्वल क्रमांक पटकावला. रक्षिता रवी हिने पांढऱ्या मोहरीने खेळताना महाराष्ट्राच्या आदिती कयालला 20 चालींमध्ये बरोबरीत रोखले. 17 वर्षीय रक्षिता ही चेन्नई येथील वेलामल विद्यालयमध्ये 12वी इयत्तेत वाणिज्य शाखेत शिकत असून चेस गुरुकुल येथे प्रशिक्षक आरबी रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. यावेळी रक्षिता म्हणाली की, या स्पर्धेत मी माझ्या लौकिकाला साजेशी खेळी करू शकले व त्यामुळे मला विजेतेपद मिळवता आले. सातव्या फेरीतील ब्रिस्टी मुखर्जीविरुद्धची लढत ही माझ्यासाठी चुरशीची ठरली कारण ब्रिस्टीने या सामन्यात उत्तम खेळी करत कडवी झुंज दिली पण मी देखील तिच्या तोडीस तोड खेळ केला व विजय मिळवला. तर, महिला आंतरराष्ट्रीय मास्टर आंध्रप्रदेशच्या बोमिनी मौनिका चौहान हिने 8.5गुणांसह दुसरा, तर महाराष्ट्राच्या भाग्यश्री पाटीलने तिसरा क्रमांक पटकावला.
मुलांच्या गटात राजस्थानच्या 15वर्षीय व्रशांक चौहान याने 9 गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. अकराव्या फेरीत राजस्थानच्या व्रशांक याने फ्रेंच डिफेन्स पद्धतीने खेळास सुरुवात करत मध्यप्रदेशच्या फिडेमास्टर आयुष शर्माचा पराभव करून विजेतेपद पटकावले. व्रशांक याने 34 चालींमध्ये आयुषवर विजय मिळवला. व्रशांक हा उदयपूर येथे विद्या भवन पब्लिक शाळेत दहावी इयत्तेत शिकत आहे. तर, तामिळनाडूच्या एजीएम विघ्नेश बी याने 8.5गुणांसह दुसरा व राजस्थानच्या अरुण कटारियाने तिसरा क्रमांक पटकावला.
स्पर्धेतील मुलींच्या गटातील विजेत्या तामिळनाडूच्या रक्षिता रवीला 100000/- रुपये व करंडक, तर उपविजेत्या आंध्रप्रदेशच्या बोमिनी मौनिका अक्षयाला 72000/-रुपये व करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. मुलांच्या गटांतील विजेत्या राजस्थानच्या व्रशांक चौहानला 100000/- रुपये व करंडक, तर उपविजेत्या तामिळनाडूच्या एजीएम विघ्नेश बी याला 72000/-रुपये व करंडक अशी पारितोषिके देण्यात आली.
स्पर्धेचे पारितोषिक वितरण इनकम टॅक्स ऍपिलेट ट्रिब्युनलचे सदस्य डॉ.दिपक रिपोटे(आय.आर.एस), महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे कार्यकारी अध्यक्ष सिद्धार्थ मयूर, एमसीएचे उपाध्यक्ष पुरषोत्तम भिलारे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमसीएचे सहसचिव निरंजन गोडबोले, पीवायसी हिंदू जिमखानाचे मानद सचिव सारंग लागु, क्लबच्या बुद्धिबळ विभागाचे सचिव शिरीष साठे, पुणे जिल्हा बुद्धिबळ सर्कलचे ट्रस्टी प्रकाश कुंटे, चीफ आरबीटर देबाशिष बरुआ आदी मान्यवर उपस्थित होते. दिप्ती शिदोरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: अकरावी फेरी: व्हाईट व ब्लॅक यानुसार:
मुले खुला गट:
एफएम आयुष शर्मा(मध्यप्रदेश)(8गुण)पराभुत वि.व्रशांक चौहान(राजस्थान)(9गुण);
एजीएम विघ्नेश बी(तामिळनाडू)(8.5गुण)बरोबरी वि.श्रीहरी एल(पुद्दुचेरी)(8गुण);
अस्वथ एस(तामिळनाडू)(8गुण)पराभूत वि.अरुण कटारिया(राजस्थान)(8.5गुण);
अर्णव खेर्डेकर(महा)(7.5गुण)बरोबरी वि.एफएम मोहम्मद अनीस एम(तामिळनाडू)(7.5गुण);
गौरांग बागवे(महा)(8गुण)वि.वि.आलेख्य मुखोपाध्याय(पश्चिम बंगाल)(7गुण);
ऋषभ गोखले(महा)(7गुण) पराभुत वि.सीएम मयंक चक्रवर्ती(आसाम)(8गुण);
हृदय पांचाल(दिल्ली)(7गुण)पराभुत वि.आदिरेड्डी अर्जुन(तेलंगणा)(8गुण);
कृष्णन ऋत्विक(महा)(7.5गुण)वि.वि.जिहान शहा(गुजरात)(6.5गुण);
सन हरिहरन(तामिळनाडू)(6.5गुण)पराभुत वि.अनाडकट कर्तव्य(गुजरात)(7.5गुण);
प्रथमेश शेरला(महा)(7गुण)बरोबरी वि.सोहम डे(पश्चिम बंगाल)(7गुण);
मंदार लाड(गोवा)(7.5 गुण)वि.वि.ध्येय अगरवाल(गुजरात)(6.5 गुण);
यश भराडिया(राजस्थान)(7गुण)वि.वि.मेहता नाईक आर(गुजरात)(6.5गुण);
ओम लामकाने(महा)(6.5गुण)बरोबरी वि. अजय पर्वतरेड्डी(उत्तरप्रदेश)(6.5गुण);
मुली :
डब्ल्यूआयएम रक्षिता रवी(तामिळनाडू)(9.5गुण)बरोबरी वि.आदिती कायल(महा)(7.5गुण);
डब्ल्यूएफएम भाग्यश्री पाटील(महा)( 8.5गुण)बरोबरी वि.तेजस्विनी जी(तामिळनाडू)(8गुण);
डब्लूएफएम ज्योत्स्ना एल(तामिळनाडू)(7.5गुण)बरोबरी वि.डब्ल्यूआयएम बोम्मिनी मौनिका अक्षया(आंध्रप्रदेश)(8.5गुण);
पूर्णा श्री एमके(तामिळनाडू)(8गुण)वि.वि.डब्ल्यूसीएम ब्रिस्टी मुखर्जी(पश्चिम बंगाल)(7गुण);
एएफएम शुभी गुप्ता(उत्तरप्रदेश)(7.5गुण)बरोबरी वि.रिंधिया व्ही(तामिळनाडू)(7.5गुण);
विजयसुभाश्री एस(तामिळनाडू)(7.5गुण)वि.वि.वेलपुला सरयू(तेलंगणा)(6.5गुण);
सानी देशपांडे(महा)(6.5गुण)पराभुत वि.साई महती ए(तेलंगणा)(7.5गुण);
कस्तुरी भाई आर(अंदमान आणि निकोबार)(7गुण)वि.वि.दिव्यभारती मसानम(तामिळनाडू)(6गुण);
दक्षिता कुमावत(राजस्थान)(6.5गुण)बरोबरी वि.मीनाची राजम व्ही(तामिळनाडू)(6.5गुण);
धनश्री खैरमोडे(महा)(7गुण)वि.वि.शास्वथा ए(तामिळनाडू)(6गुण);
डब्ल्यूसीएम संस्कृती वानखडे(महा)(7गुण)वि.वि.मरियम फातिमा(बिहार)(6गुण);
सानिया तडावी(महा)(7गुण)वि.वि.चारवी पाटीदार(राजस्थान)(6गुण);
दिशा पाटील(महा)(7गुण)वि.वि.आन्या चावत(राजस्थान)(6गुण);
साची जैन (दिल्ली)(6.5गुण)वि.वि.शेराली पटनायक(उत्तराखंड)(6 गुण).
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कसून सराव, पौष्टिक आहार आणि भरपूर झोप- स्टार फुटबॉलपटू सुनील छेत्री यांचा युवकांना सल्ला
अर्रर्र! इंग्लंडविरुद्धचा तिसरा सामना न खेळल्याने बुमराहला मोठा धक्का, आयसीसी वनडे क्रमवारीत नुकसान
आता बीसीसीआयचा कारभार सुप्रीम कोर्टाचे माजी न्यायाधीश चालवणार, वाचा काय आहे प्रकरण