मार्च-एप्रिल महिन्यात सर्वांनाच आयपीएलचे वेध लागतात. सर्वजण आयपीएल पाहण्यासाठी मैदानावर जाण्याचा प्रयत्न करतात किंवा सामना टीव्हीवर चुकवत नाही. परंतु यावर्षी कोरोनाच्या सावटामुळे आयपीएल पुढे ढकलली गेली. अखेर १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबर २०२० रोजी ही महत्त्वाची क्रिकेट स्पर्धा युएईमध्ये होतं आहे.
जर याच स्पर्धेची चर्चा करायची झाली तर आयपीएलच्या यशस्वी संघांमध्ये चेन्नई सुपर किंग्स, मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स या संघांची गणना होते. यातील चेन्नई संघाचा धडाकेबाज फलंदाज सुरेश रैनाने आजपर्यंत आयपीएलमध्ये नेहमीच चांगला खेळ केला आहे.
रैना आयपीएल इतिहासात सर्वाधिक धावा करणारा दुसरा तसेच सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडूही आहे. विशेष म्हणजे आजपर्यंत एकही मोसमात रैनाने ३७४ पेक्षा कमी धावा केलेल्या नाही.
यात रैनाने तब्बल ६ वेळा ४०० धावांचा टप्पा ओलांडला आहे. तर तीन वेळा ५०० धावांचा टप्पा पार केला आहे. तसेच त्याने तीन वेळाच ४०० पेक्षा कमी धावा केल्या आहेत.
रैनाने आजपर्यंत १९३ सामने खेळताना ३३.३४ च्या सरासरीने ५३६८धावा केल्या आहेत. यात १ शतक तर ३८ अर्धशतके केली आहेत. तसेच त्याने यात २५ विकेट्सही घेतल्या आहेत. त्यामुळे रैना आयपीएलच्या १३ व्या मोसमातही अशीच कामगिरी कायम ठेवतो का याकडे क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असेल.
रैनाला चेन्नई सुपर किंग्सने २००८ मध्ये संघात सामील करून घेतले होते. तेव्हापासून रैना २०१५ पर्यंत चेन्नई संघाकडूनच खेळला. मात्र त्यानंतर २०१६ आणि २०१७ असे दोन वर्ष चेन्नई संघावर स्पॉट फिक्सिंग प्रकरणी बंदी घालण्यात आली. त्यामुळे हे दोन वर्ष रैना गुजरात लायन्स संघाकडून खेळला. तसेच त्याने या संघाचे कर्णधारपदही सांभाळले.
२०१८मध्ये चेन्नईने आयपीएलमध्ये पुनरागमन करताना रैनाला लिलावाआधीच संघात कायम केले.
आयपीएलच्या ११ मोसमातील रैनाची कामगिरी:
४२१ धावा आणि १ विकेट – २००८
४३४ धावा आणि ७ विकेट्स – २००९
५२० धावा आणि ६ विकेट्स- २०१०
४३८ धावा आणि ४ विकेट्स- २०११
४४१ धावा आणि २ विकेट्स- २०१२
५४८ धावा आणि १ विकेट- २०१३
५२३ धावा आणि १ विकेट- २०१४
३७४ धावा आणि २ विकेट्स- २०१५
३९९ धावा आणि विकेट्स नाही – २०१६
४४२ धावा आणि १ विकेट- २०१७
४४५ धावा आणि विकेट्स नाही – २०१८
३८३ धावा आणि विकेट्स नाही- २०१९