पुणे: जागतिक महिला दिनानिमित्त डेक्कन जिमखाना यांच्या वतीने आयोजित व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए) यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या डेक्कन जिमखाना-पीएमडीटीए मानांकन महिला टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत दुसऱ्या फेरीत 14 वर्षाखालील मुलींच्या एकेरीत मृणाल शेळके, श्रावी देवरे, वीरा हरपुडे, अंजली निंबाळकर या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून आगेकुच केली.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्टवर आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत दुसऱ्या फेरीत अंजली निंबाळकरने वैष्णवी चौहानचा टायब्रेकमध्ये 5-4(4) असा संघर्षपूर्ण पराभव केला. मृणाल शेळकेने काव्या देशमुखचा 5-2 असा तर, श्रावी देवरेने आदिती सागवेकरचा 5-1 असा सहज पराभव केला. वीरा हरपुडे व अमिशी गर्ग यांनी श्रीजा कलाशेट्टी व श्रीया राव यांचा 5-0 अशा सारख्याच फरकाने पराभव करून उप-उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेत 14 वर्षाखालील मुलींच्या एकेरी व खुल्या महिला दुहेरी गटात मिळून एकूण 70 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेचे उदघाटन कोविड काळात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.वसुंधरा पाटील आणि परिचारिका रॉयल कांकनाला यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एमएसएलटीएचे मानद सचिव सुंदर अय्यर, डेक्कन जिमखानाच्या टेनिस विभागाचे सचिव आश्विन गिरमे, पीएमडीटीएचे हिमांशू गोसावी आणि डॉ. मनोज देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.
निकाल: दुसरी फेरी: 14 वर्षाखालील मुली: मृणाल शेळके वि.वि.काव्या देशमुख 5-2; श्रावी देवरे वि.वि.आदिती सागवेकर 5-1; वीरा हरपुडे वि.वि.श्रीजा कलाशेट्टी 5-0; अमिशी गर्ग वि.वि.श्रीया राव 5-0; काव्या पाटील वि.वि.मनस्वी वाकोडे 5-3; आरोही देशमुख वि.वि.आस्था कुमार 5-3; अंजली निंबाळकर वि.वि.वैष्णवी चौहान 5-4(4).
महत्त्वाच्या बातम्या-
डेविड वॉर्नरवर चढला ‘पुष्पा फिव्हर’, पाकिस्तानविरुद्धच्या कसोटीदरम्यान केले चाहत्यांचे भरपूर मनोरंजन
VIDEO: वेदनेने विव्हळत असतानाही रिझवानने नाही सोडले मैदान; झुंजार वृत्तीचे केले जातेय कौतुक
जडेजाला पाचव्या क्रमांकावर बढती देण्यात आहे संघाचाच तोटा; माजी क्रिकेटरने सांगितले कारण