भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा आज(5 नोव्हेंबर) 30 वा वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भारतीय संघातील खेळाडूंनीही विराटला शुभेच्छा दिल्या आहेत.
याचा व्हिडिओ बीसीसीआयने त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर शेअर केला आहे. या व्हिडिओतून भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने विराटला खास शुभेच्छा दिल्या आहेत.
धोनीने शुभेच्छा देताना विराटचा बंदूक हातात घेतलेला लहानपणीचा फोटो दाखवला आहे आणि म्हटले आहे की हा फोटो सिद्ध करतो की विराट तू PUBG या मोबाईल गेमचा मोठा चाहता आहे. तसेच धोनीने विराटला एक गमतीशीर सल्ला देखील दिला आहे. धोनीने विराटला सांगितले की PUBG हा मोबाईल गेम मनिष पांडेलाही शिकवं
धोनीबरोबरच या व्हिडिओतून रविंद्र जडेजा, कृणाल पंड्या, युजवेंद्र चहल, शिखर धवन, दिनेश कार्तिक, रिषभ पंत अशा भारतीय खेळाडूंनीही विराटला शुभेच्छा दिल्या आहेत.
Wishes galore for the Indian captain from the team as he celebrates his 30th Birthday. Here's to many more match-winning moments and ???????? in the cabinet.
Full video here – https://t.co/MCnjtfoIuD pic.twitter.com/Yr83r8LPyS
— BCCI (@BCCI) November 5, 2018