एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ खूप यशस्वी ठरला आहे. 2007 ते 2016 पर्यंत धोनीने भारतीय संघाचं नेतृत्व केल होतं. आणि यादरम्यान संघाने खूप काही मिळवलंही. धोनीच्या नेतृत्वात भारताने 2007 टी20 विश्वचषक, 2011वनडे विश्वचषक आणि 2013 चॅम्पियन ट्रॉफी जिंकली. तसेच संघ तिन्ही प्रकारात नंबर 1 ही राहिला.
धोनीला(MS Dhoni) भारतीय संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार बोललं गेलं तर वावगं ठरणार नाही. धोनीने कायम आपल्या निर्णयाने सर्वाना चकित केलं आहे. पण काही वेळा संघाला याचा फायदाही झाला तर काही वेळा या निर्णयामुळे संघाच नुकसानही झालं.
1 – 2009 टी20 विश्वचषक सामन्यात युवराज सिंग अगोदर रविंद्र जडेजाला फलंदाजीला पाठवणे
2009 टी20 विश्वचषक इंग्लंडमध्ये पार पडला होता. सुपर-8 मध्ये भारत पहिला सामना वेस्टइंडिज बरोबर पराभूत झाला होता. तर दुसरा सामना इंग्लंड बरोबर होता. भारतासाठी हा सामना “करो या मरो”असा होता. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत 153 धावा केल्या. विजयाचा पाठलाग करताना भारताची 2 बाद 24 अशी अवस्था होती.
यावेळी चांगल्या लयमध्ये असलेल्या युवराज(Yuvraj Singh) अगोदर जडेजाला(Ravindra Jadeja) फलंदाजीसाठी पाठवण्यात आलं. त्याने 35 चेंडूत 25 धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट 71.42 होता. जो खूप कमी होता. जडेजाची ही फलंदाजी भारताच्या हरण्याचं मुख्य कारण होती. भारत हा सामना 3 धावांनी हारला. धोनीने जडेजाला युवराज अगोदर फलंदाजीसाठी पाठवण्याचा निर्णय पूर्णपणे चुकीचा होता.
2 – 2011 नॉटिंघम कसोटीत इयान बेलला माघारी बोलावणं
भारताने 2011 मध्ये इंग्लंडला कसोटी मालिका दौरा केला होता. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना नॉटिंघम येथे खेळला गेला. प्रथम फलंदाजी करत इंग्लंडने पहिल्या डावात 221 धावा केल्या. तर भारताने 288 धावा केल्या होत्या. इंग्लंडच्या दुसऱ्या डावात अशी एक घटना घडली, ज्यामुळे धोनीची खूप प्रशंसा झाली. पण याचा तोटा शेवटी भारतीय संघाला झाला.
चहापाण्या अगोदर शेवटचा चेंडू इयान बेलने(Ian Bell) मारला होता. त्याला वाटलं तो चौकार गेला आणि तो खेळपट्टी पासून बाहेर थांबला. पण प्रवीण कुमारने त्याला धावबाद केलं. यानंतर खूप वाद झाला. पण चहापाण्यानंतर धोनीने आपलं अपील माघारी घेत, बेलला खेळण्यास बोलावलं. यानंतर त्याने 22 धावा काढल्या. जर धोनी त्याला माघारी बोलवत नव्हता, तर खेळपट्टीवर नवा फलंदाज आला असता. भारतीय संघाला त्याच्यावर दबाव टाकता आला असता. पण असं झालं नाही आणि शेवटी भारत हा सामना 319 धावांनी हारला.
3 – 2012 – ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या तिरंगी मालिकेतील रोटेशन पॉलिसी
ऑस्ट्रेलिया, भारत आणि श्रीलंका यांच्यात 2012 ला तिरंगी मालिका खेळली गेली होती. या मालिकेच्या सुरुवातीला कर्णधार एमएस धोनीने सर्वांना चकित करून टाकलं. त्यावेळी त्याने सांगीतल की रोटेशन पॉलिसीप्रमाणे गंभीर,(Gautam Gambhir) सेहवाग(Virender Sehwag) आणि सचिन(Sachin Tendulkar) अंतिम अकरात बरोबर खेळणार नाहीत.
या पाठीमागच कारण त्याने 2015 विश्वचषकावेळी सांगितलं. त्याच्या या निर्णयावर टीकाही झाल्या. त्याच्या या निर्णयाला सिनियर खेळाडूही सहमत नसल्याचं दिसून आलं होतं. ही तिरंगी मालिका संपेपर्यंत संघाच्या खराब प्रदर्शनामुळे रोटेशन पॉलिसी बंद केली गेली. आणि तिघांना अंतिम अकरात खेळवण्यात आलं पण तोपर्यंत खूप वेळ झाला होता. त्यामुळे भारतीय संघ अंतिम सामन्यात पोहचू शकला नव्हता.
4 – 2012 इंग्लंड विरुद्ध मुंबई कसोटीत तीन फिरकीपटू खेळावनं
भारत आणि इंग्लंड यांच्यात मुंबई येथे चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळवण्यात आला होता. भारत 1-0 ने मालिकेत पुढे होता. धोनीने या सामन्यात अंतिम अकरात मोठा बदल केला होता. त्याने हरभजन(Harbhajan Singh), अश्विन (Ravichandran Ashwin) आणि ओझा(Pragyan Ojha) हे तीन फिरकी गोलंदाज खेळवले. संघात झहीर (Zahir Khan) हा एकमेव जलदगती गोलंदाज होता.
पण धोनीचा हा निर्णय चुकीचा ठरला. त्यामुळे संघातील गोलंदाजांमध्ये विविधता कमी दिसून आली. इंग्लंड फलंदाज फिरकी गोलंदाजांना सहज खेळत होते. तर भारताकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. त्यामुळे इंग्लंडने हा सामना 10 विकेट राखून जिंकला.