भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी सध्या क्रिकेटपासून दूर आहे. त्याला विंडीज आणि आॅस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या टी20 मालिकेतूनही खराब कामगिरीमुळे वगळण्यात आले होते. त्यामुळे तो आॅस्ट्रेलिया विरुद्ध जानेवारीमध्ये होणाऱ्या वनडे मालिकेतून भारतीय संघात पुनरागमन करेल असे अपेक्षित आहे.
सध्या तो रांचीमध्ये सुट्टयांची मजा घेत आहे. त्यामुळे त्याने जेएचसी क्रिकेट क्लब, रांची, झारखंड येथे सुरु असलेल्या स्थानिक टेनिस स्पर्धेत सहभाग घेतला होता.
धोनी दुहेरी गटातून या स्पर्धेत सामील झाला असून त्याचा बुधवारी (30 नोव्हेंबर) सामना झाला. यावेळी त्याने सुमित बजाज बरोबर खेळत 6-3, 6-3 असा सामना जिंकला.
स्पेनचा टेनिसस्टार राफेल नदालचा मोठा चाहता असलेल्या धोनीने हा सामना जिंकल्यावर ट्रॉफी घेताना नदालसारखे पोझ दिलेले आणि टेनिस खेळतानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहेत.
Game. Set. Match.#Thala crowned with championship in the Country Cricket Club Tennis Tournament. #WhistlePodu #Yellove 💛🦁 pic.twitter.com/XqBQfNPGGb
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) November 30, 2018
https://twitter.com/msdfansofficial/status/1068481187088408577
धोनी क्रिकेट व्यतिरिक्त अन्य खेळांचाही चाहता आहे. त्याची खेळाची सुरुवातही फुटबॉल पासून झाली आहे. तो फुटबॉलचा मोठा चाहता आहे. नदालचा चाहता असल्याने तो 2016 मध्ये यूएस ओपन या ग्रँडस्लॅम स्पर्धा पाहण्यासाठीही गेला होता.
महत्त्वाच्या बातम्या:
–आॅस्ट्रेलियात भारतीय सलामीवीरांची धमाकेदार कामगिरी
–हॉकी विश्वचषक २०१८: ‘स्पीडी टायगर’ मलेशिया समोर आज तीनवेळच्या विश्वविजेत्या नेदरलँडचे आव्हान
–विंडीजचा हा गोलंदाज इंग्लंड संघाकडून खेळण्यास सज्ज, विश्वचषकाचेही स्वप्न होऊ शकते पूर्ण