भारतीय क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका (India Tour Of South Africa) दौऱ्यावर आहे. दौर्याची सुरुवात कसोटी मालिकेने झाली असून, तीन सामन्यांची ही मालिका पहिल्या दोन सामन्यांनंतर १-१ अशा बरोबरीत आहे. मालिकेतील तिसरा व निर्णायक सामना मंगळवारपासून (११ जानेवारी) केपटाऊन (Capetown Test) येथे सुरू होईल. या सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय कर्णधार विराट कोहली पत्रकार परिषदेला (Virat Kohli Press Conference) सामोरा गेला. त्याने या पत्रकार परिषदेत माजी कर्णधार एमएस धोनीने त्याला दिलेल्या एका कानमंत्राचा उलगडा केला. (MS Dhoni Advice To Virat Kohli)
काय म्हणाला विराट?
विराटने पत्रकार परिषदेत एका प्रश्नाचे उत्तर देताना भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीची आठवण काढली. करिअरच्या सुरूवातीच्या काळात त्याने दिलेला सल्ला सांगताना विराट म्हणाला, “एमएस धोनीने मला एक गोष्ट सांगितली होती, ती म्हणजे एकच चुक पुन्हा होणार असेल तर, त्यात किमान ७-९ महिन्यांचे तरी अंतर असावे. तरच तुमचे करिअर दीर्घकालीन होऊ शकेल. त्याचे ते बोल मी कायमच लक्षात ठेवलेत.”
धोनी व विराट हे संघसहकारी असताना अगदी जवळचे मित्र म्हणून ओळखले जात होते. धोनीने नेतृत्वाचा त्याग केल्यानंतर विराटला त्याचा उत्तराधिकारी म्हणून निवडले गेलेले.
विराटने या पत्रकार परिषदेत अनेक मुद्द्यांवर रोखठोक मते मांडली. त्याने स्वतःची तंदुरुस्ती, मोहम्मद सिराज या निर्णायक सामन्यासाठी उपलब्ध असेल की नाही?, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा व रिषभ पंत यांचा फार्म याविषयी आपली प्रतिक्रिया दिली. तसेच या महत्त्वाच्या सामन्यासाठी भारतीय संघाची रणनीती देखील त्याने सांगितली.
मालिका १-१ ने बरोबरीत
तीन सामन्यांची ही कसोटी मालिका सध्या बरोबरीत आहे. सेंचुरियन येथे झालेल्या पहिल्या सामन्यात भारतीय संघाने यजमान दक्षिण आफ्रिकेवर मोठा विजय मिळवला होता. जोहान्सबर्ग येथील दुसऱ्या सामन्यात दुखापतीमुळे भारताचा नियमित कर्णधार विराट कोहली उपलब्ध राहू शकला नव्हता. या सामन्यात केएल राहुलने भारताचे नेतृत्व केले. मात्र, सामन्याच्या चौथ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाला पराभूत करत मालिकेत बरोबरी साधली. केपटाऊन येथील मालिकेतील तिसरा आणि अखेरचा सामना जिंकून भारतीय संघ प्रथमच दक्षिण आफ्रिकेत मालिका जिंकण्याचा कारनामा करू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-