---Advertisement---

मेंटरबरोबर बॅटिंग कोच एमएस धोनी! हार्दिक पंड्या-रिषभ पंतला दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

On: शनिवार, ऑक्टोबर 29, 2022 12:13 PM
MS Dhoni and Hardik Pandya
---Advertisement---

टी20 क्रिकेटमध्ये फलंदाजांच्या खेळण्याची शैली पाहिली तर आपल्याला दिवसागणिक अनेक बदल पाहायला मिळाले आहेत. मग तो बदल शॉट कोणत्या चेंडूवर कसा आणि कधी खेळायचा हे असो. काही भारतीय खेळाडूंची फलंदाजी पाहिली तर आपल्याला एक बाब लक्षात येते ती म्हणजे काहीजण त्यांच्या बॅटच्या आकारावर मेहनत घेताना दिसले. ज्यामुळे त्यांच्या खेळामध्ये उत्तम बदल दिसला आहे. यामध्ये भारताच्या काही खेळाडूंचाही समावेश आहे, ज्यांना एमएस धोनीनेच तसा सल्ला दिला.

हार्दिक पंड्या (Hardik Pandya), रिषभ पंत (Rishabh Pant) आणि केएल राहुल (KL Rahul) यांची फलंदाजी पाहिली तर त्याच्या बॅटच्या तळाशी गोलाकार आकार (curve) दिसतो. ही सुपीक कल्पना एमएस धोनी (MS Dhoni) याच्या डोक्याने पुढे आली.

धोनी हा पंत आणि पंड्या यांचा मेंटर राहिला आहे. त्यानेच या दोघांना टी20 क्रिकेटमध्ये आपला खेळ उच्च दर्जाचा कसा करायचा यासाठी काही महत्वाच्या सूचना दिल्या. त्यानेच या दोघांना राउंड-बॉटम बॅट वापरण्याचा सल्ला दिला. एका वृत्त माध्यमाच्या रिपोर्ट्सनुसार, “धोनीनेच सर्वप्रथम तशा बॅट वापरल्या. आणि आता या भारतीय खेळाडूंनीही त्याच प्रकारच्या बॅटची मागणी केली आहे,” असे एसजी (सन्सपरेल्स ग्रीनलँड्स) व्यवस्थापकीय संचालक पारस आनंद यांनी म्हटले आहे.

तसेच ज्या खेळाडूंनी या बॅट वापरल्या त्यांनी आपल्याला चांगला अनुभव आल्याचे सांगितले. त्या फलंदाजांनी त्यांना लवकर बॅट स्विंग आणि पिक करता येते असे सांगितले. ही बॅट जवळपास बेसबॉलच्या बॅटसारखी आहे.

पंत आयपीएलमध्ये फलंदाजी करताना झगडताना दिसला. तेव्हा त्याने धोनीकडे धाव घेतली. एका सूत्रानुसार धोनीनेच त्याला राउंड-बॉटम बॅट वापरण्यास सांगितले. त्यानंतर पंतच्या बॅटमध्ये हवा तसा कर्व्ह आला नसला तरी आपल्या फलंदाजीत काही बदल त्याला नक्कीच दिसले.

ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या टी20 विश्वचषकात पंतला खेळण्याची संधी मिळाली नसली तरी पंड्याने ज्याप्रकारे पाकिस्तानविरुद्ध फलंदाजी केली ते पाहण्याजोगे होते. त्याने विराट कोहली याच्यासोबत 100 पेक्षा अधिक धावांची भागीदारी केली जी सामनाविजयी ठरले.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘आऊट ऑफ फॉर्म’ केएल राहुल विराट कोहलीच्या वाटेवर, ‘या’ व्यक्तिकडून मागितला गुरुमंत्र!
अन् भारताचा सर्वात वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे क्रिकेटमधून कायमचा संपला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---