आयपीएल फ्रंचायझी चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एमएस धोनी यूएईमध्ये होणाऱ्या आयपीएल २०२०च्या तयारीसाठी चेन्नईमध्ये पोहोचला आहे. तो शुक्रवारी (१४ ऑगस्ट) चार्टर्ड विमानाने रांचीवरून रवाना झाला आहे.
यादरम्यान धोनी जेव्हा विमानतळावर पोहोचला, तेव्हा त्याचा वेगळाच स्वॅग पाहायला मिळाला. तो आपली आलिशान गाडी रेंज रोव्हरने विमानतळावर पोहोचला होता. धोनीचा विमानतळावरील हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे.
धोनी आणि संघातील इतर खेळाडू यूएईला रवाना होण्यापूर्वी चेन्नईमध्ये ६ दिवसांच्या शिबिरात भाग घेणार आहेत.
आयपीएलच्या १३ व्या हंगामाचे आयोजन १९ सप्टेंबर ते १० नोव्हेंबरदरम्यान जैव- सुरक्षित वातावरणात होणार आहे.
Start The Whistles As #ThalaDhoni Is Landing At Chennai Very Soon. 🥳❤🔥#MSDhoni #Dhoni @msdhoni @SaakshiSRawat pic.twitter.com/U2YHJPBu9f
— Aabhas Raj (@AabhasRaj7781) August 14, 2020
Welcome to Chennai Thala @MSDhoni !❤ 🦁🦁🦁 @ChennaiIPL#Dhoni | #WhistlePodu pic.twitter.com/CHCMZ0aHbc
— 🎭 LΩGΣSH 🎭 ᶜˢᵏ (@IamLogesh2) August 14, 2020
धोनीने मागील वर्षी विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध पराभव स्विकारल्यानंतर एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. तो मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएल २०२० स्पर्धेत भाग घेणार होता. परंतु कोरोना व्हायरसमुळे ही स्पर्धा पुढे ढकलण्यात आली होती. आता आयपीएलचे आयोजन यूएईत होणार आहे. त्यामुळे धोनीला खेळताना पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
-इंग्लंड दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलिया संघाची घोषणा; स्टिव स्मिथ व मिचेल स्टार्कला…
-आयपीएलमधील बेंगलोर संघासाठी आदित्य ठाकरे करणार गोलंदाजी
-स्वातंत्र्यानंतर प्रत्येक दशकात भारताला मिळाला एकतरी हिरो, जाणून घ्या प्रत्येकाबद्दल
ट्रेंडिंग लेख-
-धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जला धू धू धुणारा क्रिकेटर आज कुणाला आठवतही नाही
-किस्से क्रिकेटचे १३- भारत इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवत होता, कर्णधार मात्र आराम खुर्चीत…
-अजित वाडेकरांबद्दल माहित नसलेल्या ५ गोष्टी