---Advertisement---

अय्या खरंच! आयपीएल विजेता धोनी पुन्हा बनणार ‘बापमाणूस’?, पत्नी साक्षी प्रेग्नेंट असल्याच्या चर्चा

On: शनिवार, ऑक्टोबर 16, 2021 4:41 PM
---Advertisement---

कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने शुक्रवारी (१५ ऑक्टोबर) चौथ्यांदा आयपीएलचे विजेतेपद पटकावत कोलकाता नाईट रायडर्सचा २७ धावांनी पराभव केला. सन २०१०, २०११ आणि २०१८ मध्येही चेन्नईचा संघ आयपीएल विजेता ठरला होता. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात चेन्नईने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना तीन गडी बाद १९२ धावांची मजबूत धावसंख्या उभारली आणि नंतर त्यांच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत कोलकाताला ९ बाद १६५ धावांवर रोखले.

चेन्नईच्या या यशानंतर स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या कर्णधार धोनीची पत्नी साक्षी धोनीने आनंदाने उड्या मारल्या. चेन्नई संघ जिंकताच तिच्या आजूबाजूच्या खास लोकांना मिठी मारून साक्षीने सर्वांचे अभिनंदन केले.

साक्षीच्या विजयाच्या जल्लोषाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यावरुन अनेकांनी ती गर्भवती असल्याचे अंदाज बांधले आहेत आणि लवकरच धोनीच्या घरी आणखी एक नवीन पाहुणे येणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे. चौथ्यांदा चेन्नई संघाने जेतेपद पटकावल्याच्या बातमीसोबत साक्षीच्या गर्भधारणेच्या बातम्याही सोशल मीडियावर वेगाने पसरत आहेत. सोशल मीडियावर पसरणाऱ्या बातमीत असे म्हटले जात आहे की, धोनीची पत्नी साक्षी गर्भवती आहे आणि लवकरच त्यांच्या घरी एक छोटा पाहुणा येणार आहे.

https://twitter.com/Thalajithfanboy/status/1449110740745347077?s=20

यासोबतच अजून एका बातमीने जोर धरला आहे. धोनीच्या चेन्नई संघाचा सदस्य सुरेश रैनाची पत्नी प्रियंका रैना हिने साक्षीच्या गर्भधारणेविषयी माहिती दिली आहे. साक्षी चार महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगितले जात आहे.

https://twitter.com/SaiPrabhas777/status/1449233994445307904?s=20

देहरादूनमध्ये राहणाऱ्या साक्षीने ४ जुलै २०१० रोजी धोनीशी लग्न केले. त्यावेळी साक्षी हॉटेल मॅनेजमेंटचा अभ्यास करत होती आणि कोलकाताच्या ताज बंगाल हॉटेलमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून काम करत होती. साक्षी आणि माजी भारतीय कर्णधार धोनी एकमेकांना लहानपणापासून ओळखत होते आणि दोघांचे वडील रांची येथे एकाच फर्ममध्ये काम करत होते. साक्षी आणि धोनी सुमारे दहा वर्षांनी कलकत्ता येथे भेटले आणि दोन वर्षांच्या मैत्रीनंतर दोघांनी लग्न केले.

साक्षी आणि धोनीला झिवा नावाची मुलगी आहे. महेंद्रसिंग धोनी फेब्रुवारी २०१५ मध्ये पहिल्यांदा वडील झाला होता. त्याची मुलगी आता सहा वर्षांची आहे. पण जर या बातमीवर विश्वास ठेवला तर धोनी आता दुसऱ्यांदा पिता होणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सीएसकेने चषक उंचावताच साक्षी आणि झिवाची धोनीला कडकडून मिठी, चाहत्यांचेही मन आले भरुन

आयपीएल निवृत्तीच्या प्रश्नावर थाला स्पष्टच बोलला; म्हणाला, ‘मी अजूनही सीएसके सोडलेली…’

चार वेळच्या आयपीएल विजेत्या धोनीचंच फायनलमध्ये सर्वाधिक तुटलंय हृदय, ‘इतक्यांदा’ राहिलाय उपविजेता

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---