एजबॅस्टन येथे भारत आणि न्यूझीलंड यांच्यादरम्यान १८ ते २२ जून या काळात जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जाईल. या सामन्यासाठी तसेच इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ २ जून रोजी इंग्लंडला रवाना होईल. या ऐतिहासिक अंतिम सामन्यात भारताचे नेतृत्व विराट कोहली करेल. भारताचे सर्वाधिक कसोटी सामन्यात नेतृत्व करण्याचा विक्रम विराट कोहली व एमएस धोनी यांच्या नावे संयुक्तरीत्या जमा आहे. दोघांनीही आजतागायत भारताचे ६० कसोटींमध्ये नेतृत्व केले असून, त्यानंतर दोघांपैकी कोण भारताचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार आहे हे पाहूया.
अशी आहे आकडेवारी
एमएस धोनी व विराट कोहली यांनी भारतासाठी प्रत्येकी ६० कसोटींमध्ये भारताचे नेतृत्व केले. या सर्व सामान्यांची आकडेवारी पाहिल्यास विराट कोहली हा धोनीपेक्षा सरस असल्याचे स्पष्ट होते. भारताने विराटचा नेतृत्वात खेळलेल्या सामन्यांपैकी ३६ सामन्यात विजय मिळवले आहेत तर, धोनीच्या नेतृत्वात भारताला २७ सामन्यांमध्ये विजयश्री मिळवता आली होती.
आशिया बाहेर विराट
विराट कोहली हा आशिया खंडात बाहेर देखील काही प्रमाणात यशस्वी झाला आहे. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघाने २०१८-२०१९ च्या ऑस्ट्रेलियात झालेल्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेत विजय मिळवला होता. मात्र, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका व न्यूझीलंडमध्ये त्याला पराभवाचे तोंड पाहावे लागले. दुसरीकडे धोनी केवळ न्यूझीलंडमध्ये मालिका विजय साजरा करू शकला.
मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये धोनी किंग
कसोटी क्रिकेटमध्ये धोनीचा नेतृत्वाचा जलवा नसला तरी, वनडे व टी२० मध्ये त्याचा हात कोणीही धरू शकत नाही. धोनीच्या नेतृत्वात भारताने टी२० विश्वचषक, वनडे विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफी व २ आशिया चषक जिंकले आहेत. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये विराटच्या नेतृत्वात भारतीय संघाने २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती.
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात विजय मिळवून कसोटी क्रिकेटमधील भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार करण्याची संधी विराटकडे चालून आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
WTC Final: पुजाराने पुढे आणली भारतीय संघाची नवीकोरी जर्सी, जडेजापेक्षा आहे वेगळी
लग्नाची अनोखी गोष्ट! मैदानातून थेट गाठला लग्नमंडप; संघाला विजयी करूनच पठ्ठ्या चढला बोहल्यावर