शनिवार (२६ मार्च) रोजी इंडियन प्रिमियर लिग (आयपीएल) २०२२ला मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर धडाक्यात सुरुवात झाली. कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) यांच्यात आयपीएलच्या १५व्या हंगामातील पहिला सामना खेळवण्यात आला. या सामन्यात सीएसकेचा संकटमोचक एमएस धोनी याने शानदार फलंदाजी करत संघाला सावरले. धोनीने पहिल्याच सामन्यात महत्वपूर्ण अशी ५० धावांची खेळी केली.
चेन्नईचा संघ ८३ वर ५ बाद अशा अवस्थेत असताना मैदानावर धोनी ठाण मांडून बसला. आणि त्याने वादळी खेळी करत तब्बल ५० धावा केल्या. त्याच्या या अर्धशतकाने जसे चेन्नईला सावरले तसे खेळाडू म्हणून धोनीसाठीही हे अर्धशतक अतिशय खास ठरले.
आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा धोनी बनला क्रमांक एकचा भारतीय
महेंद्रसिंग धोनीने कोलकाता संघाविरुद्ध केलेले अर्धशतक हे आयपीएलच्या इतिहासातील खास अर्धशतक होते. याचे कारण, आजवर आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये सर्वात वयस्कर भारतीय फलंदाजाने हे अर्धशतक झळकावले होते. याचा अर्थ धोनी हा आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावणारा सर्वाधिक वयस्कर भारतीय खेळाडू ठरला आहे.
MS Dhoni is the oldest Indian player to score an IPL fifty – 40y 262d.
The previous oldest was Rahul Dravid – 40y 116d.#CSKvKKR
— Umang Pabari (@UPStatsman) March 26, 2022
आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावणारे सर्वात वयस्कर भारतीय
या यादीत अर्थातच क्रमांक एकवर आहे तो शनिवारी (26 मार्च) केकेआरविरुद्ध अर्धशतक झळकावणारा महेंद्रसिंग धोनी. धोनीने वयाच्या ४० वर्ष २६२ दिवसांचा असताना ही कामगिरी केलीये. तसेच त्याने या यादीतील आतापर्यंतचा क्रमांक एकचा खेळाडू राहुल द्रविड आणि क्रमांक दोनचा सचिन तेंडुलकर यांना मागे टाकले आहे.
राहुल द्रविडने ४० वर्षे ११६ दिवस वय असताना आयपीएलमध्ये अर्धशतक झळकावले होते. तर सचिन तेंडुलकर याने ३९ वर्षे ३६२ दिवसांचा असताना अर्धशतक झळकावले होते.
महत्वाच्या बातम्या-
केकेआरच्या युवा किपरची कला पाहून मास्टर-ब्लास्टरला आठवला धोनी; क्षणार्धात केले ट्विट (mahasports.in)
कॅप्टन म्हणून पहिल्याच सामन्यात जडेजाची अक्षम्य चूक! संघाला टाकले अडचणीत (mahasports.in)