आयपीएल 2023 हंगामातील 29 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) व सनरायझर्स हैदराबाद हे संघ आमने-सामने आले. चेपॉक स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात सीएसकेचा कर्णधार एमएस धोनी याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी त्याचा हा निर्णय ठरवताना हैदराबादला 134 पर्यंत रोखले. त्याचवेळी या सामन्यात चेन्नईचा कर्णधार धोनीने आयपीएल इतिहासातील एक मोठा विक्रम देखील आपल्या नावे केला.
MS Dhoni becomes the first wicket-keeper to complete 200 dismissals in IPL history. (Catch + stumping + run-out)
Captain, Leader, Legend, Dhoni. pic.twitter.com/I7FMeIm3ht
— Johns. (@CricCrazyJohns) April 21, 2023
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना हैदराबादला चांगली सुरुवात मिळाली होती. मात्र, फिरकीपटू गोलंदाजीला आल्यानंतर चेन्नईने सामन्यावर नियंत्रण मिळवले. धोनी हा या सामन्यात कर्णधार तसेच यष्टिरक्षक म्हणून चांगलाच सक्रिय दिसला. त्याने एक झेल, एक यष्टिचित व अखेरच्या चेंडूवर एक धावबाद केला. यासह आयपीएल इतिहासात यष्टीरक्षक म्हणून 200 बळी मिळवणारा तो पहिला यष्टीरक्षक ठरला. यापूर्वी अशी कामगिरी कोणालाही जमली नाही.
धोनीने आतापर्यंत आपल्या आयपीएल कारकिर्दीत 240 सामने खेळले आहेत. त्यापैकी 202 सामन्यात त्याने चेन्नईचे नेतृत्व केले आहे. यादरम्यान त्याच्या बॅटमधून 5,037 धावा केल्या आहेत. यष्टीरक्षक म्हणून त्याच्या कामगिरीचा विचार केल्यास, त्याने 141 झेल टिपले असून, 40 यष्टिचीत मिळवले आहेत. त्याबरोबरच 19 फलंदाजांना धावबाद करण्यात देखील तो यशस्वी ठरलाय. धोनीने याच सामन्यात ऐडन मार्करम याचा झेल टिपत टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक 208 झेल देखील पूर्ण करण्याचा कारनामा केला.
या सामन्याचा विचार केल्यास हैदराबादला 35 धावांची सलामी मिळाली. अभिषेक शर्मा वगळता इतर फलंदाजांना अपयश आल्याने हैदराबादला 134 पर्यंतच मजल मारता आली. चेन्नईसाठी रवींद्र जडेजाने सर्वाधिक तीन बळी मिळवले. या सामन्यात मोठा विजय मिळवल्यास चेन्नई गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर पोहोचू शकते.
(MS Dhoni becomes the first wicket-keeper to complete 200 dismissals in IPL history Catch stumping and runout)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BREAKING: नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आयपीएल 2023 ची फायनल! क्वालिफायर-एलिमिनेटर ‘या’ शहरात
‘त्या’ गोष्टीसाठी धोनी कधीच देत नाही नकार! सहकाऱ्याने सांगितला थालाच्या दिलदारीचा किस्सा