---Advertisement---

काय सांगता! धोनीवर पुन्हा चित्रपट बनणार?

On: शनिवार, जुलै 7, 2018 8:21 PM
---Advertisement---

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या जीवनावर आधारीत  ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या बायोपीकचा सिक्वेल येणार असल्याची माहिती नुकतीच मिड डे या वृत्तपत्राने दिली आहे.

एमएस धोनीच्या बायोपिकच्या पुढच्या भागात पुन्हा एकदा सुशांत सिंग राजपूत मुख्य भुमिकेत दिसणार आहे.

‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या बायोपीकमध्ये धोनीचे बालपण ते २०११ च्या विश्वचषकापर्यंतचा प्रवास दाखवला होता.

या सिक्वेलमध्ये धोनीच्या २०११ ते २०१५ च्या विश्वचषकापर्यंतच्या कर्णधार पदाच्या कारकिर्दीचा आढावा घेतला जाणार आहे.

तसेच दोन वर्षाच्या बंदीनंतर २०१८ च्या आयपीएल मध्ये पुणरागमन करत विजेतेपदाला गवसणी घालणाऱ्या चेन्नई सुपर किंग्सचा प्रवासही यामध्ये दाखविला जाणार आहे.

धोनीच्या बायोपिकच्या पुढच्या भागात त्याच्या वैयक्तीक आयुष्यावर जास्त भर दिला जाणार आहे.

महेंद्र सिंग धोनी भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार आहे. भारताने धोनीच्या कर्णधार पदाच्या कारकिर्दित २००७ साली टी-२० विश्वचषक, २०११ साली एकदिवसीय विश्वचषक आणि २०१३ साली चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद मिळवले आहे.

एमएस धोनी आयसीसीच्या सर्व स्पर्धांचे विजेतेपद मिळवणारा जगातील एकमेव कर्णधार आहे.

भारतीय लोकांमधील क्रिकेट बद्दलचे प्रेम व या खेळाच्या आवडीमुळे भारतीय लोकांना क्रिकेट विषयीचा विविध माध्यमांच्या द्वारे अास्वाद घ्यायला आवडतो.

२०१६ साली प्रदर्शीत झालेल्या ‘एमएस धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ या धोनीच्या बायोपिकला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद लाभला होता.

महत्त्वाच्या बातम्या:

-Blog: हॅप्पी बर्थडे धोनी- रांची का छोकरा ते कॅप्टन कूल माही

-दुसऱ्या टी२० सामन्यात भारताचा पराभव, इंग्लंडने केली १-१ बरोबरी

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment