बीसीसीआयनं आयपीएल 2025 साठी रिटेन्शन नियम जारी केले आहेत. या नियमांमध्ये ‘अनकॅप्ड खेळाडू’ नियम सध्या खूप चर्चेत आहे. या नियमाचा सर्वाधिक फायदा चेन्नई सुपर किंग्जला होईल. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर, महेंद्रसिंह धोनीचा आयपीएल 2025 मध्ये खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे!
वास्तविक, बीसीसीआय आयपीएल 2025 मध्ये जुना ‘अनकॅप्ड रिटेन्शन’ नियम लागू करणार आहे. या नियमानुसार, आगामी आयपीएल हंगामापूर्वी गेल्या पाच वर्षांमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट न खेळलेल्या कॅप्ड भारतीय खेळाडूची गणना ‘अनकॅप्ड’ खेळाडू म्हणून केली जाईल. तसेच, गेल्या 5 वर्षांत खेळाडूचा बीसीसीआय सोबत कोणताही वार्षिक करार नसेल, तरीही तो खेळाडू अनकॅप्ड मानला जाईल.
हा नियम महेंद्रसिंह धोनीसाठी अगदी योग्य आहे. आता चेन्नई सुपर किंग्ज फ्रँचायझी धोनीला अनकॅप्ड खेळाडू म्हणून रिटेन करू शकेल. यासाठी सीएसकेला फक्त 4 कोटी रुपये खर्च करावे लागतील. आयपीएल 2025 अंतर्गत सर्व संघांना जास्तीत जास्त 2 अनकॅप्ड खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलनं जारी केलेल्या रिटेन्शन नियमांनुसार, आयपीएल 2025 मध्ये सहभागी होणाऱ्या सर्व 10 संघांना जास्तीत जास्त 5 कॅप्ड आणि 2 अनकॅप्ड खेळाडूंना रिटेन करण्याची परवानगी असेल. तसेच, संघांना आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात आपल्या एका खेळाडूसाठी राईट टू मॅच (RTM) कार्ड देखील वापरता येईल. यासोबतच आयपीएलमध्ये परदेशी खेळाडूंच्या सहभागाबाबतही अनेक नवे नियम लागू करण्यात आले आहेत.
आयपीएल 2025 रिटेन्शन नियम
(1) 5 रिटेन्शन आणि 1 राईट टू मॅच
(2) एकूण पर्स 120 कोटी रुपये
(3) सर्व 5 खेळाडूंना रिटेन केलं तर 75 कोटी रुपये भरावे लागतील
(4) इम्पॅक्ट प्लेअर नियम कायम राहील
(5) ऑक्शनमध्ये खरेदी केलेल्या खेळाडूने माघार घेतली तर त्याच्यावर 2 वर्षांची बंदी
(6) भारतासाठी गेल्या 5 वर्षांत न खेळलेला खेळाडू अनकॅप्ड मानला जाईल
हेही वाचा –
IPL 2025 Retention Rules; रिटेंशन नियमात मोठे बदल, RTM कार्डचाही वापर होणार
ब्रेकिंग! बांगलादेशविरुद्धच्या टी20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा, सूर्यकुमार कर्णधारपदी कायम
जय शहांनी उघडला पेटारा! आयपीएल खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना आता प्रति सामना मिळणार ‘इतकी’ फीस