भारतीय क्रिकेट संघाचा सर्वकालीन महान कर्णधार एमएस धोनी याने शुक्रवारी (7 जुलै) आपला 42 वा वाढदिवस साजरा केला. त्याच्या वाढदिवशी चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात त्याला शुभेच्छा दिल्या. स्वतः धोनीने आपल्या फार्म हाऊसवर वाढदिवस साजरा केला. त्याने हा वाढदिवस अविस्मरणीय करताना आपल्या श्वानांसह केक कापला. स्वतः धोनीने पोस्ट केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
भारताचा माजी कर्णधार असलेला धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून तीन वर्षापूर्वीच निवृत्त झालेला आहे. असे असले तरी आयपीएलमध्ये मात्र तो सातत्याने खेळताना दिसतोय. नुकत्याच झालेल्या आयपीएलच्या हंगामात त्याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्सने पाचव्यांदा विजेतेपद पटकावले होते. त्यानंतर आता धोनीने आता आपला 42 वा वाढदिवस साजरा केला.
या वाढदिवशी धोनीने रांची येथील आपल्या फार्म हाऊसवर छोटेखानी स्वरूपात आयोजन केले होते. तत्पूर्वी, त्याने आपल्या पाळीव श्वानांसह वाढदिवस साजरा केला. यामध्ये धोनी स्वतः केक कापत आपल्या श्वानांना केक भरवताना दिसतोय. या व्हिडिओला धोनीने कॅप्शन देताना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या सर्वांचे धन्यवाद मानले.
धोनीने 2004 मध्ये आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यानंतर अवघ्या चारच वर्षात भारतीय संघाचे कर्णधारपद मिळवले होते. त्याच्या नेतृत्वात भारताच्या युवा संघाने 2007 टी20 विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. त्यानंतर 2011 वनडे विश्वचषक देखील भारताने जिंकला. इंग्लंडमध्ये 2013 साली झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारताने विजय मिळवल्यानंतर धोनी तीनही आयसीसी ट्रॉफी जिंकणारा पहिला कर्णधार बनलेला. 2020 मध्ये त्याने 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केलेली.
(MS Dhoni Celebrate His 42 nd Birthday With His Pet Dogs Thanks To Fans)
महत्वाच्या बातम्या-
लीड्समधील न्हाव्याचा कांगारू खेळाडूवर मोठा आरोप! म्हणाला, ‘त्याने पैसे देण्याचे वचन दिले पण…’
फास्ट बॉलर्ससाठी गुड न्यूज! बीसीसीआयच्या निर्णयामुळे महत्वाच्या स्पर्धेत मिळणार फायदा