जगातील महान क्रिकेटपटूंपैकी एक असलेला भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग यशाची सर्व उंची गाठूनही आपल्या गावी रांचीपासून दूर गेलेला नाही. धोनीला जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा तो त्याच्या गावी रांचीमध्ये नक्कीच वेळ घालवतो. धोनीला फक्त रांची आवडत नाही तर तो इथे आपल्या मित्रांसोबत खूप मजा करतो आणि त्यांच्या छोट्या-छोट्या आनंदात सहभागी होऊन त्याला खास बनवण्याची एकही संधी तो सोडत नाही.
असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता ज्यात धोनी त्याचा मित्र टेनिस प्रशिक्षक सुरेंद्र कुमारच्या वाढदिवसाला उपस्थित होता. यावेळी सुरेंद्रचे संपूर्ण कुटुंबही उपस्थित होते आणि त्याचा वाढदिवस जेसीए स्टेडियमवर साजरा करण्यात आला.
Latest video of MS Dhoni from a birthday celebration 😍❤️ pic.twitter.com/9gAOH6cYCp
— MAHIYANK™ (@Mahiyank_78) June 22, 2022
टीम क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरही धोनी या खेळात सक्रिय आहे. धोनी इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व करतो. १५व्या हंगामात त्याच्या संघाची कामगिरी काही खास नसली तरी तो आयपीएलमधील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली सीएसकेच्या संघाने चार वेळा विजेतेपद पटकावले आहे.
त्याचवेळी, ४० वर्षीय धोनीने त्याच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला सर्व प्रमुख आयसीसी विजेतेपदे (एकदिवसीय विश्वचषक, टी२० विश्वचषक आणि चॅम्पियन्स ट्रॉफी) जिंकली आहेत. धोनीने भारतासाठी ९० कसोटी, ३५० एकदिवसीय आणि ९८ टी२० सामने खेळले आहेत. याशिवाय त्याने २३४ आयपीएल सामनेही खेळले आहेत. धोनीने कसोटी क्रिकेटमध्ये ४८७६ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर वनडेमध्ये त्याच्या नावावर १०७७३ धावांची नोंद आहे. याशिवाय त्याने टी२० मध्ये १६१७ धावा केल्या आहेत. त्याचबरोबर त्याने आयपीएलमध्ये ४९७८ धावा केल्या आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
संघात घेतलं नाही म्हणून क्रिकेटपटूचा आत्महत्येचा प्रयत्न, स्वतःची नस कापली
रोहित शर्मा ‘नॉर्मल बॉलर’ म्हंटलेला, आता सहा वर्षांनी पाकिस्तानी गोलंदाजाचे प्रत्युत्तर
महिला सुपर सिक्समध्ये पुणेरी वॉरियर्सची विजयी सलामी