---Advertisement---

सराव करताना धोनीने मारलेला षटकार पाहून मुरली विजय झाला दंग; बोलती झाली बंद

On: शनिवार, सप्टेंबर 12, 2020 12:01 PM
---Advertisement---

मुंबई । भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी बर्‍याच काळापासून क्रिकेटपासून दूर असला, तरी तो फॉर्मच्या बाहेर गेलेला दिसत नाही. आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार धोनी सध्या युएईमध्ये आहे आणि आयपीएल स्पर्धेच्या तयारीत व्यस्त आहे.  यंदाच्या आयपीएल हंगामासाठी चेन्नई सुपर किंग्जने सराव सत्र सर्वात विलंबाने सुरू केले. कारण संघातील खेळाडू व सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना युएईमध्ये अन्य संघांपेक्षा अधिक काळ अलग ठेवण्यात आले होते अखेर मागील आठवड्यात त्यांनी सरावाला सुरुवात केली.

या सरावादरम्यानचा चेन्नई सुपर किंग्ज संघाने 35 सेकंदाचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये धोनी दुबई आंतरराष्ट्रीय सामन्यात सराव करताना दिसतो. हा व्हिडिओ टीम मॅनेजर रसेल राधाकृष्ण यांनी चित्रीत केला आहे. व्हिडिओमध्ये धोनी एक मोठा षटकार मारताना दिसला.

त्याचा षटकार पाहून सीमारेषावर उभे असलेला मुरली विजय आश्चर्यचकित झाला. व्हिडिओ बनवत असलेल्या रसेल ला पाहून तो म्हणाला, “रसेल ही शक्ती आहे. उत्तम टायमिंग, बॅट स्पीड आणि उत्तम स्विंग जे की त्याला एक गिफ्ट मिळाले आहे. यापेक्षा चांगले असू शकत नाही. गोलंदाजांना वाईट वाटत असेल.”

गतवर्षी विश्वचषकातील उपांत्य सामन्यानंतर एमएस धोनीने कोणताही सामना खेळलेला नाही. मात्र, एक वर्षाहून अधिक काळानंतर मैदानात पुनरागमन करणार्‍या धोनीचा फॉर्म चेन्नईसाठी खूप चांगले चिन्ह आहे. विरोधकांसाठी मोठे आव्हान आहे. बीसीसीआयच्या वेळापत्रकानुसार आयपीएलच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जचा सामना गतवर्षीचा चॅम्पियन मुंबई इंडियन्सशी होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---