fbpx
Maha Sports
Marathi Sports News Updates

कार्तिक आणि पंत या दोघांपेक्षा धोनीच भारी…तरीही टी२०मधुन वगळले

भारतीय क्रिकेट संघाचा यशस्वी कर्णधार आणि यष्टीरक्षक एमएस धोनीला आगामी विंडीज आणि ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या टी-20 मालिकेत संघामध्ये जागा मिळाली नाही. पहिल्यांदाच धोनीला टी-20 संघात जागा मिळाली नाही.

भारतीय संघ निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांच्या मते यष्टीरक्षकासाठी दुसरे पर्याय तयार करण्याची गरज आहे. म्हणुनच त्यांनी दिनेश कार्तिक आणि रिषभ पंतला संघात घेतले आहे.

मागील एक वर्षातील धोनीची वनडेची कामगिरी निराशजनकच होती. मात्र टी-10 मधील त्याची फलंदाजी आणि यष्टीरक्षण कार्तिक आणि पंतपेक्षा उत्तम आहे. यावेळी त्याने कार्तिक आणि पंत या दोघांच्या एकूण धावा मिळून 71 टक्के धावा अधिक केल्या आहेत. यामध्ये सामन्याच्या संख्या सारख्याच आहेत.

धोनीने मागच्या वर्षी 13 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात खेळताना 52.40च्या सरासरीने 262 धावा केल्या. तर दोन टी-20 सामन्यात तो खेळलाच नव्हता. तसेच 6 टी-20 सामन्यात तो नाबाद राहिला होता. याचबरोबरच यष्टीरक्षण करताना त्याने विरोधी संघातील 20 खेळाडूंना पवेलियमध्ये परत धाडले. यामध्ये त्याने घेतलेल्या 11 झेल आणि 9 यष्टीचीतचा समावेश आहे.

तसेच कार्तिकने मागील एक वर्षात 11 टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये त्याने 121 धावा केल्या आणि विरोधी संघातील 7 खेळांडूना (चार झेल आणि 3 यष्टीचीत) परत पाठवले. तर दुसरीकडे पंतने दोनच टी-20 सामने खेळले आहेत. यामध्ये फलंदाजी आणि यष्टीरक्षणात मात्र तो अपयशी ठरला आहे. त्याने दोन सामन्यात प्रत्येकी फक्त 23 आणि 7 धावा केल्या आहेत

विंडीज विरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यात 37 वर्षीय धोनीने हेमराज चंद्रपॉलचा झेल 3 सेकंदात 19 मीटर अंतरावरून पकडला होता. यावरूनच असे दिसून येते की धोनी हा फलंदाजी आणि यष्टीरक्षणाबरोबरच फिटनेसमध्येही पंत आणि कार्तिकपेक्षा उत्कृष्ठ आहे.

तसेच धोनीने 2006मध्ये टी-20 सामन्यात पदार्पण केले. तेव्हापासून भारताने 104 टी-20 सामने खेळले असून यातील 93 सामन्यात धोनीचा संघात समावेश होता. तसेच यावर्षी झालेल्या आयपीएलमध्यही (इंडियन प्रीमियर लीग) फलंदाजी सरासरीच्या बाबतीत धोनीच अव्वल स्थानावर राहिला होता.

महत्त्वाच्या बातम्या:

देश आधी… रोहितने चाहत्यांना मैदानातूनच दिला संदेश, पहा व्हिडीओ

ते सेलिब्रेशन २० वर्षीय खलील अहमदला पडले महागात

You might also like