आयपीएल 2023 मध्ये सहावा सामना चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध लखनऊ सुपरजायंट्स असा खेळला गेला. चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर खेळला गेलेल्या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना 7 बाद 217 धावा केल्या. चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याने चार वर्षानंतर चेन्नईच्या मैदानावर उतरताना सलग दोन चेंडूवर दोन षटकार मारत थाटात 5000 आयपीएल धावांचा टप्पा पार केला.
A treat for the Chennai crowd! 😍@msdhoni is BACK in Chennai & how 💥#TATAIPL | #CSKvLSG
WATCH his incredible two sixes 🔽 pic.twitter.com/YFkOGqsFVT
— IndianPremierLeague (@IPL) April 3, 2023
🚨 Milestone Alert 🚨
5️⃣0️⃣0️⃣0️⃣ runs in #TATAIPL for magnificent MSD! 🫡🫡
Follow the match ▶️ https://t.co/buNrPs0BHn#TATAIPL | #CSKvLSG | @msdhoni pic.twitter.com/InAuRN5oNu
— IndianPremierLeague (@IPL) April 3, 2023
चेन्नई सुपर किंग्स संघ तब्बल चार वर्षानंतर आपल्या घरच्या मैदानावर खेळत होता. ऋतुराज गायकवाड व डेवॉन कॉनवे या सलामी जोडीने संघाला शतकी भागीदारी करून दिली. त्यानंतर शिवम दुबे याने देखील काही आक्रमक फटके खेळले. मात्र, चेन्नईच्या डावातील चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे धोनीची फलंदाजी. अखेरच्या षटकातील केवळ पाच चेंडू खेळण्यासाठी आलेल्या धोनीने सर्वांची मने जिंकली. त्याने सलग दोन चेंडूंवर दोन षटकार खेचत मैदानावरील प्रेक्षकांना अक्षरशः वेडावून टाकले. तिसऱ्या चेंडूवर मात्र त्याला बाद होऊन परतावे लागले.
तीन चेंडूच्या या खेळीत धोनीने आयपीएल इतिहासातील एका खास यादीत आपले नाव नोंद केले. त्याने दुसऱ्या षटकारांसह आयपीएलमध्ये 5000 आयपीएल धावा पूर्ण केल्या. त्याच्या नावे आता 236 सामन्यात 5004 धावा जमा झाल्या आहेत. आयपीएलमध्ये हा पराक्रम सहा फलंदाजांनी केला आहे. यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, सुरेश रैना, शिखर धवन, डेव्हिड वॉर्नर व एबी डिव्हिलियर्स यांचा समावेश आहे.
(MS Dhoni complete 5000 Runs In IPL Hits 2 Consecutive Sixes In 20th Over)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चार वर्षांनंतर चेपॉकवर उडाला टॉस! लखनऊचा गोलंदाजीचा निर्णय, सीएसके करणार फलंदाजी
विजयानंतरही आरसीबीचे वाढले टेन्शन! टोप्लीच्या दुखापतीने गोलंदाजी आक्रमण लंगडे? दुखापतग्रस्तांची वाढली यादी