---Advertisement---

MS Dhoni | रेकॉर्ड तोडणारा नाही Record बनवणारा ‘माही’, भारतीय क्रिकेटपटू म्हणून बनवला खास रेकॉर्ड

MS-Dhoni
---Advertisement---

इंडियन प्रिमियर लीग २०२२ (आयपीएल) स्पर्धेत पहिल्या सामन्यापासून चर्चेचा केंद्रबिंदू ठरलेल्या महेंद्रसिंग धोनीने आयपीएलच्या प्रत्येक सामन्यात नवनव्या विक्रमांना गवसणी घालण्याचे सत्र सुरुच ठेवले आहे. पहिल्या सामन्यात धुवांधार अर्धशतक आणि दुसऱ्या सामन्यात १६ धावांची महत्वपूर्ण वादळी खेळी केल्याने, धोनीने टी२० क्रिकेटमध्ये ७ हजार धावांचा मोठा पल्ला गाठला. मात्र, लखनौ विरुद्धच्या सामन्यातच एमएस धोनीने आणखीन एका विक्रमाला गवसणी घातली. (MS Dhoni New Record)

महेंद्रसिंग धोनी म्हणजे भारतीय क्रिकेट इतिहासातील एक सोनेरी पान. त्याच्या नावावर क्रिकेटमधील अनेक विक्रम नोंदवलेले आहेत. भारतीय संघाचा खेळाडू, विविध फ्रँचायझीचा खेळाडू म्हणूनही त्याच्या नावावर अनेक पराक्रम, विक्रमांची नोंद आहे. आयपीएल २०२२च्या सातव्या सामन्यात देखील महेंद्रसिंग धोनीने एक ‘भारतीय खेळाडू’ म्हणून खास विक्रमाची नोंद केली. मात्र, त्याचा हा विक्रम वर नमुद केल्याप्रमाणे धावांशी संबंधीत नसून धावा रोखण्यासंबंधीत आहे. (MS Dhoni T20 Record)

एम एस धोनी (MS Dhoni) भारतीय संघाचा प्रमुख यष्टीरक्षक राहिलेला आहे. त्यासह तो ज्या-ज्या संघांकडून खेळला, खासकरुन फ्रँचायझींसाठी त्या संघांचाही तो प्रमुख यष्टीरक्षक राहिला. त्यामुळेच धोनीने यष्टीमागे अनेक विक्रम केलेत. आयपीएलच्या पंधराव्या हंगामात लखनौ संघाविरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज (सीएसके) संघाचा दुसरा सामना खेळत असताना एमएस धोनीने क्विंटन डी कॉकचा सुंदर झेल घेतला. हा झेल धोनीसाठी अतिशय खास ठरला आहे. ( CSK vs LSG , IPL 2022 )

टी-२०मध्ये अशी कामगिरी करणारा धोनी पहिलाच भारतीय….

क्विटंन डी कॉकचा धोनीने घेतलेला झेल हा त्याच्या टी-२० कारकिर्दीतील २०० वा झेल होता. त्याला हा झेल अनेकांगानी विक्रमी आहे. याचे कारण टी-२० क्रिकेटमध्ये आजवर कोणत्याही भारतीय खेळाडूने २०० झेल घेतलेले नाहीत. त्यामुळे महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) हा टी-२० क्रिकेटमध्ये २०० झेल घेणारा पहिला भारतीय ठरला आहे.

( MS Dhoni completed 200 catches in T20 format first Indian to complete milestone )

अधिक वाचा –

द ग्रेट धोनी.! LSG विरुद्धच्या सामन्यात MS DHONI कडून कारकिर्दीतील अविस्मरणीय विक्रमाला गवसणी

द ग्रेट धोनी.! LSG विरुद्धच्या सामन्यात MS DHONI कडून कारकिर्दीतील अविस्मरणीय विक्रमाला गवसणी

चेन्नईसोबत खेळताना लखनौची गोलंदाजी भरकटली पण रेकॉर्डबुकमध्ये झाली एन्ट्री; केएल राहुलला हे विसरणे अशक्य

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---