मुंबई । आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर एमएस धोनीने आता आयपीएलवर केंद्रित आहे. धोनीच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्ज 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरू होणार्या आयपीएलमध्ये आपली मोहीम सुरू करणार आहे. प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे की धोनी आता पुढे काय करेल. म्हणजेच आयपीएल संपल्यानंतर धोनी काय करणार आहे? भारताला दोन विश्वचषक जिंकून देणारा धोनी निवृत्त झाल्यानंतर सैन्यात अधिक वेळ घालवेल, असे त्याच्या एका जवळच्या मित्राने सांगितले.
धोनीचे सैन्याबद्दलचे प्रेम सर्वश्रुत आहे. तो नेहमी आर्मी प्रिंटचे ग्लव्ज घालतो. संधी मिळताच तो सैन्यासह प्रशिक्षणासाठी जातो. त्याने निवृत्तीही स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी घेतली.
2011 मध्ये धोनीला भारतीय सैन्याने लेफ्टनंट कर्नल म्हणून मानद उपाधी दिली होती. त्यानंतर बर्याचदा तो भारतीय लष्करासमवेत दिसून आला आहे.
सेवानिवृत्ती घेतल्यानंतर धोनीचा एक व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे. जो त्याचा पहिला पॅरा जंम्पचा आहे. 2015 मध्ये धोनीने 1250 फूट उंचीवरून प्रथमच पॅरा जंप केला होता आणि त्याने तो यशस्वीपणे पूर्ण केला.
Lieutenant Colonel Mahendra Singh Dhoni successfully completed the fourth jump as part of his training with the elite Para Jump School under 106 Parachute Regiment of the Territorial Army on Friday morning.#msdhoni #Dhoni #DhoniJumping #DhoniParatrooper #Syrafills pic.twitter.com/aYEFrATj7n
— Twell (@TwellMagazine) August 19, 2020
धोनी 58 सेकंदात हसत हसत खाली उतरला. धोनीला जेव्हा त्यांच्या पहिल्या पॅरा जंपिंगच्या अनुभवाबद्दल विचारले गेले होते तेव्हा तो म्हणाला होता की, ‘आयुष्यातील सर्वात सुंदर स्वप्न सत्यात उतरले आहे. त्या दरम्यान मला कोणतीही अडचण झाली नाही.’
पॅरा जंप ही धोनीच्या भारतीय सैन्यातील एलिट पॅरा रेजिमेंटबरोबर प्रशिक्षणाचा एक भाग होती. त्याने एएन -32 ट्रांसपोर्ट एयरक्राफ्टमधून पॅरा-जंप केले. 2015 मध्ये, आग्रा प्रशिक्षण शिबिरात धोनी पाच वेळा पॅराशूट प्रशिक्षण जंप करत क्वालिफाईड पॅराट्रुपर बनला होता.