---Advertisement---

कसोटीतून निवृत्तीनंतर धोनी रात्रभर होता व्हाईट जर्सीमध्ये, रात्रभर डोळ्यातून येत होतं पाणी

On: गुरूवार, ऑगस्ट 20, 2020 6:32 PM
---Advertisement---

मुंबई । भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तेव्हापासून सहकारी खेळाडू त्यांच्याबरोबरच्या विशेष आठवणी शेअर करत आहेत. दरम्यान भारतीय संघाचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने धोनीशी संबंधित एक खुलासा केला आहे. अश्विन म्हणाला की, ‘कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर धोनीच्या डोळ्यात अश्रू आले. तो रात्रभर पांढरी जर्सी घेतला होता.’

धोनीने 2014-15 च्या ऑस्ट्रेलिया दौऱ्या दरम्यान कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर तो केवळ मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळत होता.

अश्विनने सांगितले की, “मला आठवते की जेव्हा त्याने 2014 मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तेव्हा मी मेलबर्नमध्ये त्याच्याबरोबर सामना वाचवण्याचा प्रयत्न करीत होतो. जेव्हा आम्ही सामना गमावला तेव्हा त्याने एक स्टम्प उचलला आणि म्हणाला बस आता पूर्ण झाले. हा क्षण त्याच्यासाठी खूप भावनिक होता. संध्याकाळी मी, सुरेश रैना आणि ईशांत शर्मा त्याच्या खोलीत बसलो होतो. धोनीने रात्रभर आपली पांढरी जर्सी घातली होती. त्याच्या डोळ्यात अश्रू होते.”

अश्विन धोनीशी झालेल्या पहिल्या भेटीचा संदर्भ देताना म्हणाला की, “चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर भारत-वेस्ट इंडीज वनडे सामन्यात नेट बॉलर म्हणून मी प्रथम त्याला भेटलो. त्यानंतर जेव्हा मी 2008 मध्ये चेन्नई सुपर किंग्जमध्ये रुजू झालो तेव्हा मला त्याच्याबरोबर खेळण्याची आणि बरेच काही शिकण्याची संधी मिळाली. मी जेव्हा त्याला प्रथम भेटलो तेव्हा त्याचे केस लांब होते, परंतु त्यानंतर सीएसके येथे त्याच्याबरोबर वेळ घालवल्यानंतर मला समजले की तो एक परिपक्व खेळाडू आणि कर्णधार आहे.”

“धोनीने माझ्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात उत्तम सल्ला दिला होता, जो की मी आजही फॉलो करतो. 2010 च्या चॅम्पियन्स लीगदरम्यान महत्त्वाचा सल्ला दिला होता. मी व्हिक्टोरिया बुशर्स विरूद्ध सुपर ओव्हर फेकली, जी यशस्वी झाली नाही. यानंतर एमएस माझ्याकडे आला आणि म्हणाला की तू दडपणाखाली आपला सर्वोत्तम चेंडू टाकला नाही. आपल्याकडे कॅरम बॉल आहे, जो अधिक वापरण्याची आवश्यकता आहे,”असे आर अश्विनने सांगितले.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---