---Advertisement---

बाबा रे! निवृत्ती नको घेऊ; एवढा विश्वचषक खेळून जा, धोनीने २०११ला केली या मॅचविनर क्रिकेटकडे मागणी

On: गुरूवार, ऑगस्ट 13, 2020 6:41 AM
---Advertisement---

भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या भविष्याबाबत अनेक तर्क लावण्यात येत आहेत. गतवर्षी झालेल्या विश्वचषकातील उपांत्य सामन्यानंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसला नाही. आता भारतीय क्रिकेट संघाचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराने सांगितले आहे की, कशाप्रकारे धोनीने त्याला २०११ सालच्या विश्वचषकापुर्वी निवृत्ती घेण्यापासून थांबवले होते. MS Dhoni Convinced Ashish Nehra Not To Retire Before World Cup 2011

नेहराला त्याच्या कारकिर्दीत दुखापतींमुळे खूप त्रास झाला होता. त्याला होणाऱ्या दुखापतींमुळे तो बराच काळ संघातून बाहेर राहिला होता. २०११ सालच्या विश्वचषकापुर्वीही नेहराला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार केला होता. पण, धोनीने त्याला निवृत्ती घेण्यापासून थांबवले होते.

विस्डेन ग्रेटेस्ट राइवलरी पॉडकास्टवर बोलताना नेहराने सांगितले, “विश्वचषक सुरु होण्यापुर्वी माझ्या पाठीला दुखापत झाली होती. त्यामुळे मी त्रस्त होऊन विचार केला की, मी आता खेळू शकणार नाही. मी क्रिकेट सोडून देतो. पण, त्यावेळी प्रविण कुमार आणि दूसरा कोणता तरी वेगवान गोलंदाज जखमी होता. त्यामुळे एस श्रीसंतला संघात स्थान देण्यात आले होते. मी धोनी आणि सचिन तेंडुलकरला म्हणालो होतो की, मी विश्वचषक खेळू शकेल असे मला वाटत नाही. मी जास्त संघर्ष करण्याआधी तुम्ही माझ्या ठिकाणी दूसऱ्या गोलंदाजाला संधी द्या.”

“हे ऐकून धोनी मला म्हणाला होता की, तू दोन ते तीन आठवडे थांब. फिजिओसोबत रहा आणि त्यांच्यासोबत राहून तुझ्या या अडचणीला सोडव. तीन आठवडे वाट पाहिल्यानंतर आम्ही ठरवू पुढे काय करायचे आहे,” असे पुढे बोलताना नेहराने सांगितले.

२०११ विश्वचषकात नेहराने भारताकडून तीन सामने खेळले होते. नेदरलँडविरुद्धच्या सामन्यात त्याने २२ धावा देत १ विकेट घेतली होती. तर, दक्षिण आफ्रिकाविरुद्धच्या सामन्यात त्याने ६५ धावा देत एकही विकेट घेतली नव्हती. पाकिस्तानविरुद्धच्या उपांत्य फेरी सामन्यातील विजयात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. नेहराने उपांत्य फेरी सामन्यात १० षटके टाकत ३३ धावा देत २ विकेट्स चटकावल्या होत्या. पण, दुर्दैवाने त्याला श्रीलंकाविरुद्धच्या अंतिम सामन्यात खेळण्याची संधी दुखापतीमुळे मिळाली नव्हती.

याविषयी बोलताना नेहरा म्हणाला की, “मला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे पुढील २ दिवसात सर्जरी करण्यासाठी मला ऑस्ट्रेलियाला जावे लागले होते. ते खूप दुर्दैवी स्थिती होती. पण, या गोष्टीचा आनंद होता की आम्ही अंतिम सामना जिंकत विश्वचषकावर नाव कोरले होते. माझ्यासाठी ते सर्व रोलर कोस्टर राइडसारखे होते. पण शेवटी मी सुरक्षित होतो. ”

नेहराने २००१मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध वनडेत पदार्पण केले होते. त्याने त्याच्या वनडे कारकिर्दीतील शेवटचा सामना २०११सालच्या विश्वचषकात पाकिस्तानविरुद्ध खेळला होता. दरम्यान त्याने भारताकडून १२० वनडे सामने खेळत ३१.७३च्या सरासरीने १५७ विकेट्स घेतल्या होत्या.

महत्त्वाच्या बातम्या –

कित्येक भारतीय क्रिकेटर्सची कारकिर्द घडवणारा मुंबईकर काळाच्या पडद्याआड

पहिल्यांदाच भारतीय क्रिकेटर सापडली नाडाच्या जाळ्यात, होऊ शकते ४ वर्षांसाठी बंदी

कुटुंबातील सदस्याच्या निधनामुळे हुकले इंग्लंडच्या ‘या’ खेळाडूचे कसोटी पदार्पण

ट्रेंडिंग लेख –

भारताच्या ८८ वर्षांच्या कसोटी क्रिकेट इतिहासात सर्वात यशस्वी ठरलेले ५ कर्णधार

कसोटीत खेळताना जगभर धुमाकूळ घालणारे भारताचे सर्वात यशस्वी ५ गोलंदाज

४ दिग्गज कर्णधार ज्यांनी भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---