मुंबई । चेन्नई सुपर किंग्जचा (सीएसके) कर्णधार एमएस धोनीच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. सीएसकेचा गोलंदाज मोनू कुमार याचा अद्याप वैद्यकीय अहवाल आलेला नाही नाही. बुधवारी दोन्ही खेळाडूंची चाचणी घेण्यात आली. इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) 13 व्या हंगामात खेळण्यासाठी येत्या 14 ऑगस्ट रोजी धोनी विशेष विमानाने चेन्नईला रवाना होईल.
कोरोना व्हायरसमुळे, या वेळी आयपीएल 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान युएईमध्ये खेळले जाणार आहे. सीएसके संघाचे खेळाडू यूएईला जाण्यापूर्वी 15 ऑगस्टपासून चेन्नईच्या शिबिरात सामील होतील. सीएसकेचा संघ 21 ऑगस्टला युएईला रवाना होईल.
साक्षी आणि झिवा या वेळी आयपीएलमध्ये दिसणार नाहीत
आयपीएलमध्ये धोनी अनेकदा पत्नी साक्षी आणि मुलगी झिवासोबत असतो, पण यावेळी तो संघातील सदस्यांसह आयपीएलमध्ये वेळ घालवेल. संघाच्या सर्व खेळाडूंसह सीएसकेचा कर्णधार धोनीने निर्णय घेतला आहे की कोरोनाच्या काळात त्यांचे कुटुंब त्यांच्यासह यूएईला जाणार नाही. कुणालाही त्यांच्या कुटुंबाबाबत जोखीम घ्यायची नाही.
धोनीने रांचीमध्ये इनडोअर सराव सुरू केला
संघात सामील होण्यापूर्वी धोनीने रांचीस्थित झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशन (जेएससीए) मध्ये इनडोअर सराव सुरू केला आहे. सरावादरम्यान, कोरोनामुळे गोलंदाजासह कोणालाही येऊ दिले नव्हते. या कारणास्तव धोनी गोलंदाजीच्या मशीनद्वारे सराव करीत आहे.
यूएईला जाण्यापूर्वी सर्व खेळाडूंची 5 वेळा होणार कोरोना चाचणी
बीसीसीआयने 20 ऑगस्टनंतर सर्व फ्रँचायझींना यूएईमध्ये जाण्यास आधीच मान्यता दिली आहे. यूएईमध्ये जाण्यापूर्वी खेळाडू आणि कर्मचार्यांची किमान 5 वेळा कोरोना चाचणी होणे आवश्यक आहे. तसेच युएईला जाण्यापूर्वी सर्व खेळाडूंना त्यांच्या शहरातून दोनदा चाचणी केल्यानंतर संघात सामील व्हावे लागेल. जेथे 7 दिवस क्वारंटाईन ठेवण्याच्या वेळी तीन चाचणी होतील. सर्वांचा निगेटिव्ह अहवाल आल्यानंतरच खेळाडू संघासह यूएईमध्ये जाऊ शकतील. प्रत्येक संघात फक्त 24 खेळाडू असतील. पहिल्यांदा 25 खेळाडूंना मान्यता होती.
महत्त्वाच्या बातम्या-
-अकरा वर्षांनंतर पाकिस्तानच्या ‘या’ खेळाडूने क्रिकेटमध्ये केले पुनरागमन; झाली अनोख्या विक्रमाची नोंद
-‘मला संघातून वगळण्याचा निर्णय योग्यच होता,’ ४१ शतके ठोकणाऱ्या खेळाडूने केले मोठे वक्तव्य
ट्रेंडिंग लेख-
-१९९०मध्ये आयपीएल झाली असती तर हे खेळाडू झाले असते मालामाल
-या महान खेळाडूने सरळ सांगतिले, डीकाॅक नाही होऊ शकत दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार
-भारताचे ५ डावखुरे महान फलंदाज, ज्यांनी रचला आहे क्रिकेटमध्ये इतिहास