गुरुवारी (७ ऑक्टोबर) आयपीएल २०२१ च्या ५३ व्या सामन्यात पंजाब किंग्ज आणि चेन्नई सुपर किंग्ज संघ एकमेकांशी भिडले. या सामन्यात पंजाब किंग्जने मोठा विजय मिळवला. पंजाबचा कर्णधार केएल राहुलने सामन्यात त्याच्या संघासाठी महत्वाची खेळी केली. त्याच्या खेळीच्या जोरावर पंजाबने अवघ्या १३ षटकांमध्ये सामना जिंकला. सामन्यात एक क्षण असा आला होता, ज्यामध्ये सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीची मुलगी झिवा आनंदामध्ये नाचताना दिसली होती. झिवाला नाचताना पाहून सुरेश रैनाही आनंदी झाला होता. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
तर झाले असे की, सामन्यात चेन्नई सुपर किंग्जच्या फलंदाजीवेळी १९ व्या षटकामध्ये रवींद्र जडेजा फलंदाजी करत होता. जडेजा फलंदाजी करत असताना विरोधी संघाकडून तो पायचित झाला असल्याची अपील करण्यात आली. पंचांनी याबर नाबाद करार दिला, पण केएल राहुल या निर्णयामुळे समाधानी नव्हता आणि त्याने डीआरएस घेतला. डीआरएसनंतर तिसऱ्या पंचांनी याबाबत निर्णय दिला आणि तो नाबाद असाच होता. तिसऱ्या पंचांच्या या निर्णयानंतर धोनीची गोंडस मुलगी झिवा आनंदाने नाचू लागली.
https://twitter.com/JalaluddinSark8/status/1446080524590608385?s=20
https://twitter.com/Fangirlofvd/status/1446090262657208322?s=20
तिला पाहून सीएसकेचा दिग्गज फलंदाज सुरेश रैनाही खुश झाल्याचे पाहायला मिळाले. चाहतेही झिवा आणि रैनाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून सुखावले आहेत आणि सोशल मीडियावर याबबत प्रतिक्रिया देत आहेत.
दरम्यान, सामन्यात पंजाबने नाणेफेक जिंकली आणि प्रथम चेन्नईला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. चेन्नईने प्रथम फलंदाजी करत २० षटकांमध्ये ६ विकेट्स गमावल्या आणि १३४ धावा केल्या. चेन्नईने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाबने चार विकेट्स गमावल्या आणि अवघ्या १३ षटकांमध्ये सामन्यात विजय मिळवला. चेन्नईसाठी त्यांचा सलामीवीर फलंदाज फाफ डू प्लेसिसने ५५ चेंडूत ७६ धावांची खेळी केली. तसेच पंजाबसाठी त्याचा कर्णधार केएल राहुने ४२ चेंडूत नाबाद ९८ धावांची जबरदस्त खेळी केली आणि विजयामध्ये महत्वाची भूमिका पार पाडली.
महत्त्वाच्या बातम्या-
विरोधी संघाला १०० धावांच्या आत ऑलआऊट करण्यात ‘या’ ३ संघांचा दबदबा, केकेआर अव्वल स्थानी
विजय केकेआरचा, पण ट्रोल होतेय मुंबई इंडियन्स, सोशल मीडियावर मीम्सचा सुळसुळाट
मुंबईचं प्ले ऑफचं स्वप्न अजूनही होऊ शकत पूर्ण, पुढच्या सामन्यात करावी लागणार ‘ही’ गोष्ट