डब्लिन। भारतीय संघ आज, 29 जूनला आयर्लंड विरुद्ध दुसरा टी20 सामना खेळणार आहे. या सामन्यासाठी भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीला 11 जणांच्या भारतीय संघात स्थान देण्यात आलेले नाही.
त्याच्या ऐवजी दिनेश कार्तिकला संधी देण्यात आली आहे. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने याआधीच पहिल्या सामन्यानंतर याची कल्पना दिली होती.
ज्या खेळाडूंना पहिल्या सामन्यात संधी मिळाली नाही त्यांना दुसऱ्या सामन्यात संधी दिली जाईल असे त्याने पहिल्या सामन्यानंतर सांगितले होते.
धोनी बरोबरच मागील सामन्यात अर्धशतक केलेल्या शिखर धवनलाही 11 जणांच्या संघात स्थान मिळालेले नाही. तसेच जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि वॉशिंग्टन सुंदर यांनाही 11 जणांच्या संघात आज संधी मिळाली नाही.
भारताकडून आज मध्यमगती गोलंदाज सिद्धार्थ कौल आंततराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणार आहे. त्याला आज सामन्यापूर्वी भारताची कॅप कॅप्टनकूल एमएस धोनीच्या हस्ते देण्यात आली.
याबरोबरच आज 65 टी 20 सामन्यानंतर वेगवान गोलंदाज उमेश यादवने भारतीय टी20 संघात पुनरागमन केले आहे.
या सामन्यात आयर्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे.
Here's the Playing XI for #IREvIND. pic.twitter.com/VGAVUVt8E4
— BCCI (@BCCI) June 29, 2018
IND XI: L Rahul, R Sharma, V Kohli, S Raina, D Karthik, M Pandey, U Yadav, K Yadav, Y Chahal, S Kaul
— BCCI (@BCCI) June 29, 2018
IRE XI: P Stirling, J Shannon, A Balbirnie, S Singh, G Wilson, K O'Brien, W Porterfield, S Thompson, G Dockrell, B Rankin, P Chase
— BCCI (@BCCI) June 29, 2018
महत्त्वाच्या बातम्या:
–टीम इंडीयाचा हा खेळाडू आज करणार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण
–स्मिथला खेळताना पाहुन राशीद खानने असा व्यक्त केला आनंद!
–टीम इंडिया रिलॅक्स, डब्लिन शहरात घेतेयं सहलीचा आनंद