गुरुवारी (31 ऑक्टोबर) भारतासह जगभरात दिवाळीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. भारतीय क्रिकेटपटू आणि बॉलिवूड कलाकारांसह इतर प्रसिद्ध लोकांनी दिवाळी साजरी करतानाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
सध्या भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा एक व्हिडिओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये माही दिवाळीनिमित्त त्याच्या घरी पूजा करताना दिसत आहे. कॅप्टन कूलसोबत कुटुंबातील इतर सदस्यही दिसतात. यावेळी महेंद्रसिंह धोनीनं लाल रंगाचा सुंदर कुर्ता घातला होता. त्याचा या ड्रेसमधील लूक पाहण्यासारखा आहे. या लाल रंगाच्या कुर्त्यामध्ये माही खूपच हँडसम दिसत आहे.
महेंद्रसिंह धोनीसोबत त्याची पत्नी साक्षी धोनी देखील आहे. हे दोघं व्हिडिओमध्ये दिवाळीनिमित्त पूजा करताना दिसतात. या व्हिडिओची सोशल मीडियावर सध्या चांगलीच चर्चा होत आहे. यूजर्स यावर सतत कमेंट करून माहीला दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. तुम्ही धोनीचा हा सुंदर व्हिडिओ येथे पाहू शकता.
Good Morning Dhoni Nation!!
Be Sanatani First!! ❤️ pic.twitter.com/ZtFZc6gX1w
— DIPTI MSDIAN (@Diptiranjan_7) November 1, 2024
महेंद्रसिंह धोनीबद्दल बोलायचं झालं तर, चेन्नई सुपर किंग्सनं आयपीएल 2025 साठी धोनीला रिटेन केलं आहे. सीएसकेनं त्याला ‘अनकॅप्ड खेळाडू’ म्हणून 4 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवलं. याशिवाय चेन्नई सुपर किंग्जनं कर्णधार ऋतुराज गायकवाड, अष्टपैलू रवींद्र जडेजा, वेगवान गोलंदाज मथिशा पाथिराना आणि स्फोटक फलंदाज शिवम दुबे यांना रिटेन केलं.
चेन्नईनं ऋतुराज गायकवाड आणि रवींद्र जडेजा यांना 18 कोटी रुपयांमध्ये रिटेन केलं. त्याचवेळी त्यांनी मथिशा पाथीरानासाठी 13 कोटी रुपये मोजले. सीएसकेनं अष्टपैलू शिवम दुबेला 12 कोटी रुपयांमध्ये कायम ठेवलं आहे. या 5 खेळाडूंना रिटेन करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्जला 65 कोटी रुपये खर्च करावे लागले. अशाप्रकारे आता मेगा ऑक्शनमध्ये संघाकडे 55 कोटी रुपये असतील.
हेही वाचा –
भारतीय संघानं बाहेर केलेल्या गोलंदाजाचा ऑस्ट्रेलियात जलवा, कांगारुंविरुद्ध 6 विकेट घेऊन जोरदार कमबॅक!
जसप्रीत बुमराह तिसरी कसोटी का खेळत नाहीये? बीसीसीआयनं जारी केलं धक्कादायक अपडेट
रिटेन्शनंतर कोणत्या संघाकडे किती पैसे शिल्लक? या संघाच्या खात्यात 110 कोटींहून अधिक