तिरुअनंतपुरम। भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील तिसऱ्या टी २० सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भारतीय कर्णधार विराट कोहलीने एम एस धोनीच्या टीकाकारांना चोख प्रतिउत्तर दिले आहे.
विराटला धोनीबद्दल विचारले असता तो म्हणाला, ” मला समजत नाही कि लोक त्याला लक्ष्य का करतात. जर मी एक फलंदाज म्हणून ३ वेळा अपयशी ठरलो तर मला लोक लक्ष्य लार्णार नाही कारण माझं ३५ पेक्षा जास्त वय नाही.”
विराट धोनीच्या फिटनेसवर म्हणाला ” धोनी फिट आहे आणि त्याने सर्व फिटनेस चाचण्या यशस्वी पार केल्या आहेत. त्याचेमैदानात सर्व गोष्टीत संघासाठी योगदान असते. त्याने श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया विरुद्ध चांगली फलंदाजी केली होती.”
तसेच विराटने दुसऱ्या टी २० च्या सामन्याचे उदाहरण देताना म्हणाला, “या मालिकेत त्याला जास्त वेळ फलंदाजी मिळाली नाही. तो ज्या स्थानी खेळायला येतो ते तुम्ही समजून घ्यायला हवे. राजकोटमध्ये झालेल्या दुसऱ्या टी २० सामन्यात हार्दिक पांड्यानेही धावा केल्या नव्हत्या तरीही फक्त एकाच व्यक्तीला दोषी कसे धरता. हार्दिकही त्या सामन्यात लवकर बाद झाला होता तरीही एकाच व्यक्तीला लक्ष्य करणे योग्य नाही.”
https://twitter.com/MsdianOnly/status/927977321511862272
दुसऱ्या टी २० सामन्यात धोनी जेव्हा फलंदाजीला आला तेव्हाच्या परिस्थीविषयी बोलताना विराट म्हणाला “धोनी जेव्हा फलंदाजीला आला तेव्हा धावगती आधीच ८.५-९.५ पर्यंत गेली होती. नवीन बॉलने जेव्हा गोलंदाजी चालू होती तशी खेळपट्टी तेव्हा नव्हती. खालच्या क्रमांकावर खेळायला येणाऱ्या फलंदाजापेक्षा खेळपट्टीवर स्थिर झालेल्या वरच्या क्रमांकावर खेळायला येणाऱ्या फलंदाजासाठी फलंदाजी करणे सोपे होते. त्या दिवशी आम्ही ज्या खेळपट्टीवर खेळलो त्यावर नंतर खेळ करणे अवघड होती.”
विराट पुढे म्हणाला ” एक खेळाडू म्हणून आणि संघ व्यवस्थापक म्हणून आम्ही समजू शकतो की कोणत्या परिस्थितीत खेळाडू फलंदाजीसाठी जात आहे. आम्ही लोकांच्या मताने भवानी कुंवा उत्सुक होत नाही कारण ते वेगळ्या दृष्टीने खेळाकडे बघतात. तुम्ही जर मैदानात असाल तर तुम्ही समजू शकता की खेळपट्टी कश्याप्रकारची आहे.”
“तो जे करत आहे ते योग्य आहे. तो त्याच्या खेळावर कष्ट घेत आहे आणि त्याला त्याची संघातील भूमीका कळते. पण प्रत्येकवेळी सगळं चांगलाच होईल असे नाही. त्याने दिल्लीमध्ये जो षटकार खेचला होता तो सामन्यानंतर झालेल्या शोमध्ये ५ वेळा दाखवण्यात आला आणि आता एका सामन्यात जो चांगला खेळाला नाही म्हणून आपण लगेच त्याच्या निवृत्तीविषयी बोलायला लागलो.”
“लोकांनी थोडा संयम दाखवायला हवा. तो असा खेळाडू आहे ज्याला क्रिकेट काय आहे हे समजते. तो खूप हुशार आहे आणि त्याला त्याच्या खेळाविषयी आणि फिटनेसविषयी माहित आहे. मला नाही वाटत त्याच्याशिवाय दुसऱ्या कोणाला त्याच्याविषयी निर्णय घ्यायचा अधिकार आहे”
काल भारतीय संघाने न्यूझीलंड विरुद्ध झालेल्या तिसऱ्या आणि निर्णायक टी २० सामन्यात ६ धावांनी विजय मिळवला होता. हा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे ८ षटकांचाच करण्यात आला होता.