भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थातच बीसीसीआयला क्रिकेटविश्वातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हटले जाते. मग श्रीमंत बोर्डाचे क्रिकेटपटूही तितकेच श्रीमंत असणार. त्यातही जर विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह अशा अव्वल क्रिकेटपटूंच्या कमाई तर कोट्यांवधीमध्ये असतात. भारतीय क्रिकेट संघाच्या यशस्वी आणि दिग्गज कर्णधारांपैकी एक असलेला एमएस धोनी यानेही आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत चिक्कार पैसा कमावला आहे. परंतु साल २०२० मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतरही इंडियन प्रीमियर लीगमधील कमाई सोडून तो वर्षाला जवळपास १११ मिलियन डॉलर कमावतो.
आयपीएल वगळता त्याचे धन कमावण्याचे दुसरे साधन कोणते आहे? हा प्रश्न तुम्हाला पडला असणार. तसे तर धोनीच्या कमाईच्या इतर साधनांबाबत फार कमी जणांना माहिती असेल. येथे आम्ही त्याच्या वेगवेगळ्या कमाई साधनांची माहिती दिली आहे. चला तर सुरुवात करुया…
जिमचा मालक आहे धोनी
कॅप्टनकूल धोनी हा ‘स्पोर्ट्सफिट वर्ल्ड प्राइव्हेट लिमिटेड’ नामांकित एका मोठ्या कंपनीचा मालक आहे. या कंपनीचे पूर्ण भारतभर २०० हून अधिक जिम आहेत.
जाहिरातीतून मिळते मोठी रक्कम
धोनी हा भारतीय क्रिकेट संघातील सर्वाधिक ब्रँड व्हॅल्यू असलेल्या क्रिकेटपटूंपैकी एक आहे. आयपीएलदरम्यान किंवा इतरवेळी त्याच्या बऱ्याचशा जाहिराती टिव्हिवर लागत असतात. अर्थातच वेगवेगळ्या ब्रँडच्या जाहिरातींद्वारेही धोनीला मोठी रक्कम मिळते. तो मास्टरकार्ड, नेटमेड्स, मॅट्रिमनी, कार्स २४, इंडियन टेरेन, रेडबस, पेनेराई, अशोक लेलैंड, स्निकर्स, ड्रीम इलेव्हन, इंडिगो पेंट्स अशा बऱ्याचशा कंपनीचा ब्रँड ऍम्बेसेडर आहे
धोनीचे आहे मोठे हॉटेल
क्रिकेटव्यतिरिक्त धोनीने व्यवसाय क्षेत्रातही हात आजमावला आहे. झारखंडमध्ये त्याचे मोठे पंचतारांकित हॉटेल आहे. या हॉटेलचे नाव हॉटेल ‘माही रेसिडेंसी’ आहे. हे धोनीचे एकमेव हॉटेल असून त्याची इतर कोणतीही ब्रॅँच नाही.
फुटबॉल आणि हॉकी संघाचाही आहे मालक
क्रिकेटचा दिग्गज धोनीला कधीकाळी फुलबॉल क्षेत्रात गोलकिपर बनण्याची इच्छा होती. भलेही तो फुलबॉलपटू बनू शकला नाही. परंतु त्याने फुलबॉल संघ मात्र विकत घेतला आहे. तो इंडियन सुपर लीगच्या ‘चेन्नईयीन एफसी’ संघाचा मालक आहे. एवढेच नव्हे तर, तो ‘रांची रेज’ या हॉकी संघाचाही मालक आहे.
तसे तर, धोनीचे बाईक आणि इतर गाड्यांवरील प्रेम आपल्यापासून लपून राहिलेले नाही. बाईकप्रेमी धोनीने या क्षेत्रातही मोठी गुंतवणूक केली आहे. तो ‘सुपरस्पोर्ट वर्ल्ड चॅम्पियनशीप’मध्ये ‘माही रेसिंग टीम इंडियाचा मालक’ आहे. या संघात दाक्षिणात्त्य अभिनेता नागार्जुन अख्खीनेनीसोबत त्याने पार्टनरशिप केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
दुर्लक्ष, फक्त दुर्लक्ष! श्रीलंका दौऱ्यावरही निवड न झाल्याने उनाडकटने उचलले ‘मोठे पाऊल’
SLvIND: संघनायकाची दिव्यदृष्टी! संजूने फारपुर्वीच केली होती त्याच्या सहकाऱ्याच्या निवडीची भविष्यवाणी
‘जेंटलमेन गेम’ची नाचक्की! शाबिकपुर्वी ‘या’ स्टार क्रिकेटपटूंचाही लाईव्ह सामन्यात सुटलाय संयम