महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली असूनही तो कायम चर्चेत असतो. नुकताच धोनी सोशल मीडियावर स्ट्रॉबेरीमुळे प्रसिद्ध झाला आहे. धोनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट केली आहे व त्यात तो आपल्या शेतातील स्ट्रॉबेरी खाताना दिसत आहे.
धोनीने व्हिडिओ शेअर करत लिहिले की, “जर मी शेतात जात राहिलो, तर बाजारासाठी एकही स्ट्रॉबेरी रहणार नाही.” धोनीचा हा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
https://www.instagram.com/p/CJx0AucpG5_/
धोनीने मागील वर्षी 15 ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घोषित केली होती. निवृत्तीनंतर तो आयपीएल २०२० मध्ये खेळला होता. मात्र आयपीएल मध्ये त्याचा वैयक्तिक फॉर्म खूपच खराब होता. चेन्नई संघाने देखील आयपीएल मध्ये निराशाजनक कामगिरी केली होती. चेन्नई संघ इतिहासात पहिल्यांदाच प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवण्यात अयशस्वी ठरला होता. आयपीएल 2020 चा समारोप झाल्यानंतर धोनी दुबईत दीर्घ सुट्टीसाठी थांबला होता. तेथे तो पत्नी साक्षी आणि मुलगी जीवासमवेत दिसला होता. अलीकडेच धोनीने युजवेंद्र चहल आणि त्याची पत्नी धनश्री यांना डिनर पार्टीमध्येही आमंत्रित केले होते.
धोनी यानंतर मैदानावर थेट आयपीएल 2021 मध्ये दिसणार आहे. आयपीएल 2021 मध्ये धोनीकडून सर्व चाहत्यांना उत्तम कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
महत्वाच्या बातम्या:
चीते की चाल, बाज की नजर और जडेजा की थ्रो पे कभी संदेह नहीं करते
आयडियाची कल्पना! लॅब्यूशानेने बॅटची ग्रीप बसवताना हँडेलवर फुंकर घातल्याचं हे होतं कारण
विमान कोसळलं! हेलिकॉप्टर शॉट मारण्याच्या नादात राशिद गोल्डन डक; समालोचकांनाही आवरेना हसू