भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी जगभरातील क्रिकेट चाहत्यांचा आवडता खेळाडू आहे. चाहत्यांना धोनीविषयी सर्वकाही जाणून घ्यायचे असते. चाहत्यांना नेहमीच आपल्या आवडत्या खेळाडूच्या वैयक्तिक आयुष्यातील गोष्टीही जाणून घ्यायच्या असतात. याच पार्श्वभूमीवर नुकत्याच पार पडलेल्या एका कार्यक्रमात धोनीने आपल्या जर्सीचा क्रमांक 7 असण्यामागचे कारण स्पष्ट केले आहे.
भारतीय संघाला तीन आयसीसी ट्रॉफी जिंकवून देणारा एमएस धोनी सध्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये खेळत आहेत. धोनी जेव्हा कधी मैदानात उतरला किंवा अजूनही उतरतो तेव्हा त्याच्या जर्सीचा क्रमांक 7 असतो. चाहत्यांमध्येही धोनीची जर्सी प्रचंडन लोकप्रिय आहे. चाहत्यांमध्ये अनेकदा धोनीच्या 7 क्रमांकाची चर्चा होत असते. पण अद्याप धोनीने 7 क्रमांकच का निवडला, हे कुणाला समजले नव्हते. आता स्वतः ‘थाला’ने जर्सी क्रमांकामागे असलेले कारण सांगितले आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. व्हिडिओत धोनीला प्रश्न विचारला गेला की, “7 नंतर तुझ्यासाठी महत्वाचा का आहे? या वेळेच्या आतमध्ये तुझ्या आई-वडिलांनी तुला घरी यायला सांगितले होते का?” या गमतीशीर प्रश्नावर धोनीने मिश्किल उत्तर दिले. धोनी म्हणाला, “नाही खरं सांगायचं तर ही दिवसतील ती वेळ होती, जेव्हा माझ्या आई-वडिलांनी ठरवले की, मी या जगात येणार आहे.”
MS Dhoni talking about the importance of “7” in his life.
– A witty reply from Thala. 😄👌pic.twitter.com/vnFVrD2YGk
— Johns. (@CricCrazyJohns) February 11, 2024
जर्सी क्रमांक 7 निवडण्यामागचे कारण सांगताना धोनी म्हणाला की, “माझा जन्म 7 जुलै रोजी झाला आहे. जुलै वर्षातील सातवा महिना आहे. 1981 साली मी जन्माला आलो. शेवटचे दोन आकडे म्हणजे 8 मधून 1 गेला खाली राहतात 7. त्यामुळे जेव्हा मी तिथे जाईल (भारतीय संघात) आणि मला जर्सीचा क्रमांक विचारला जाईल, तेव्हा माझ्याकडे उत्तर देणे सोपे होते.”
दरम्यान, धोनीने आयपीएळ 2024 साठी कंबर कसली आहे. आगमी आयपीएल हंगामात पुन्हा एकदा सीएसकेला कर्णधार म्हणून विजय मिळवून देण्यासाठी धोनी प्रयत्न करेल. मागच्या वर्षी सीएसकेने धोनीच्याच नेतृत्वात आपली पाचवी आयपीएल ट्रॉफी जिंकली होती. (MS Dhoni explains the reason behind his number 7 jersey)
महत्वाच्या बातम्या –
सौरव गांगुलीचा महागडा मोबाईल घरातून चोरी! माजी दिग्गजाचे मोठे नुकसात, पोलिसांकडे तक्रार दाखल
SA20 2024 Final : परदेशात काव्या मारनच्या सनरायझर्सने फडकावला झेंडा! सलग दुसऱ्यांदा जिंकले विजेतेपद